मोरपंख घरामध्ये आवर्जून ठेवावे

0
51
mor pankh ke vastu upay

मोरपंख घरामध्ये आवर्जून ठेवावे.

नमस्कार मंडळी, मंडळी मोरपंखाला अगदी पुराणकाळापासून वेदकाळापासून फार महत्त्व दिले गेलेले आहे. देवांचा राजा इंद्र हा मोरपंखाच्या  आसणावरच बसतो. तर प्रत्यक्षपणे माता सरस्वती आणि गणपतीचा भाऊ कार्तिकेय याचे वाहन हे सुद्धा मोर आहे. ऋषी मुनींनी आतापर्यंत वेदांचं जेवढ लिखान केलेल आहे तेसुद्धा वेळोवेळी मोर पंखा पासून बनवलेल्या लेखणीचा वापर करून. आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तर आपल्या डोक्यावरील मुकुटामध्ये मोरपंखाचाच वापर करतात. म्हणजेच मोरपंख अतीशय पवित्र मानले गेलेले अगदी वेदकाळापासून. अशा रीतीने प्रत्यक्ष श्रीहरींनी आपल्या मस्तकावर ज्या मोरपंखाला स्थान  दिलेल आहे त्याचा अध्यात्मिक महत्व काय आहे. त्याचा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कसा उपयोग करावा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा उपयोग अध्यात्म शास्त्रानुसार काय काय आहे याविषयीची  माहिती आज आपण घेणार आहोत.

चला तर मग आपण माहिती घेऊ या. आपल्या रोजच्या जिवनामध्ये या मोरपंखाचा फायदा आपल्याला कशाप्रकारे करून घेता येईल. मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मोर पंखाचं अस्तित्व ज्या ठिकाणी असते त्या भागांमध्ये निसर्गतःच  सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते. आणि त्या भागामध्ये नकारात्मक ऊर्जा हि नष्ट पावत असते. मोरपंखाच्या याच  गोष्टीचा फायदा घेऊन त्याचे उपयोग आपल्याला करता येतात सर्वप्रथम आपल्या वास्तूमध्ये एकतरी मोरपंख असावा. जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये काहीहि  कारणामुळे येणारी किंवा अगोदरच असलेली नकारात्मक ऊर्जा नाश होऊन चांगले सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूला प्राप्त व्हावि.

साधारणतः ज्या घरामध्ये सतत, काही-ना-काही कारणावरून घरामध्ये असलेल्या सदस्यांमध्ये बारीकसारीक गोष्टींवरून वाद, चीड-चीड  होत असते. घरामध्ये अशांतता असते. अशा वास्तूमध्ये सात मोरपंख एका फोटो फ्रेममध्ये बसवून हि फोटोची फ्रेम ज्या भागांमध्ये आपल्या घरातील सदस्य जास्त वेळ एकत्र बसतात म्हणजे हॉलमध्ये, अशा ठिकाणच्या भिंतीवर अवश्य  लावावे. विशेषकरून हि सात मोरपंखांची फ्रेम पूर्व दिशेच्या भिंतीवर लावली असता, वास्तूमध्ये आर्थिक सुबत्ता, व्यवसाय, व्यवसाया मध्ये बरकत येण्यास, समाजामध्ये मान-सन्मान प्राप्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. तसेच आजारपणावर सुद्धा मात करण्यास चांगली मदत होते. ज्या कुटुंबामध्ये पती-पत्नीमध्ये सतत वाद आहेत आणि हे वाद कमी होण्यासाठी, लोकांमधील सामंजस्य  वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये दोन मोरपंख असलेली  फोटो फ्रेम झोपण्याच्या ठिकाणी बेडच्या डोक्याकडील भागाच्या भिंतीवरती अवश्य टांगावी.

खूपच चांगला प्रेमसंबंध वाढवण्यासाठी उपयोग होतो. किंवा आपल्या लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये एक मोरपंख  अवश्य ठेवून द्यावा. ऑफिसमध्ये आपण ज्याठिकाणी बसतो, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा लाभ होण्यासाठी आपल्या बाजूला एका फुलदाणीमध्ये कमीत-कमी सात मोरपंख तरी ठेवावेत. मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा अभ्यासाबद्दल काही भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली असते. अशा वेळी सुद्धा, मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी, त्यांच्या अभ्यासाच्या टेबल जवळ मोरपंख आवर्जून ठेवावेत. किंवा एखादा मोरपंख फ्रेम करून त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये भिंतीवर टांगून ठेवावा. खूप चांगला फायदा होतो.

ज्यांच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ भागामध्ये आलेलं आहे, आशानीसुद्धा आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेश द्वारावर तीन मोरपंख असलेली फोटोची फ्रेम अवश्य लावून घ्यावी.

मंडळी घात-पात, अपघात यापासून सुद्धा सौरक्षण करण्यास मोरपंख आपल्याला मदत करत. आणि म्हणूनच जर आपली फोर व्हीलर असेल तर आपल्या गाडीच्या समोरच्या भागामध्ये एक मोरपंखाची छोटीशी फ्रेम आवश्य करून ठेवावी. आणि ज्यांची टू व्हीलर असेल त्यांनी आपल्या गाडीच्या चवीला मोरपंख लावून घ्यावेत. त्यामुळे अपघातासारख्या वाईट गोष्टीपासून बचाव होण्यास मदत तर होतेच शिवाय आपण ज्या कामासाठी चाललोय त्या कामात यश येण्यात, चांगले मार्ग मिळण्यास सुद्धा मदत होते. आपल्या आयुष्यामध्ये कधीही, एखाद्यावेळी फार मोठी आर्थिक विवंचना निर्माण झाली असेल किंवा एकादी मोठी अडचण निर्माण झाली असेल, अशावेळी आवर्जून आपल्या वास्तूच्या आग्नेय दिशेमध्ये मोरपंख ठेवावेत. त्यामुळे निश्चित आपल्याला चांगला मार्ग मिळण्यास मदत मिळते असं वास्तुशास्त्र सांगत. आपल्याला बरोबर सतत सकारात्मक ऊर्जा असावी, अशा लोकांसाठी, म्हणजेच  स्वतः बरोबर एक तरी मोरपंख आपल्या खिशामध्ये नेहमी बाळगावं.  मंडळी हे होते मोरपंखाचे फायदे.

आता पाहूया काही सूचना. मंडळी बाजारातून मोर पंख आणताना ते तुटलेलं किंवा खराब असलेल  कधीहि आणू नये. चुकून कधी आपल्या हातून मोरपंख खाली जमिनीवर पडलं तर याची काळजी घ्यावी लगेच ते उचलून ठेवावे कारण प्रत्यक्ष श्रीहरींनी ते आपल्या डोक्यावर धारण केलेल आहे. मंडळी हे मोरपंख आणताना मोराला कोणतीही इजा करून ते आणू नये. कारण हे मोर स्वतःहूनच मोरपंख गाळत असतात. आणि त्यांच्या जागी त्यांना नवीन मोरपंख येत असतात.  त्यामुळे असे सहजपणे प्राप्त झालेले मोरपंख आणावेत. मोराला हानी करून ते मोरपंख आणू नयेत.  आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मघाशी सांगितल्याप्रमाणे मोरपंख वापरताना नेहमी श्रीकृष्णाचं  नामस्मरण करून ते वापरावेत. निश्चित खूपच चांगला फायदा होतो.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here