महाशिवरात्रीच्या दिवशी करा कालसर्प दोष निवारण उपाय
नमस्कार मित्रानो, आपल्याही कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल, व या दोषामुळे आपल्याला अनेक समस्यांना, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असेल. तर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करता येतात. ज्या उपायांमुळे आपल्याला कालसर्प दोषाचे निवारण करता येते.
मित्रानो, सर्व देवी-देवतांचे खुपसारे उत्सव असतात, पर्व असतात. परंतु भगवान शंकराचं जो सर्वात मोठा पर्व आहे, उत्सव आहे, तो म्हणजे महाशिवरात्री. फाल्गुन महिन्यातील, कृष्ण पक्षमध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी महाशिवरात्रीचा पर्व साजरा केला जातो. तसे पाहता प्रत्येक महिन्यामधील कृष्ण पक्षमध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी, शिवरात्री असते, पण ती मासिक शिवरात्री असते. आणि फाल्गुन महिन्यातील, कृष्ण पक्षमध्ये येणाऱ्या त्रयोदशीच्या दिवशी जी शिवरात्री असते तिला महाशिवरात्री म्हणतात. असा मानलं जात कि ह्या दिवशीच भगवान शंकर प्राकट्य झाले होते. हे पहा, याठिकाणी आम्ही भगवान शंकरांच्या जन्म किंवा मृत्यूविषयी बोलत नाही आहोत. भगवान शंकरांचा तर न कोणता आदी आहे आणि न कोणता अंत. आम्ही सांगत आहोत भगवान शंकर आजच्या दिवशीच प्राकट्य झाले होते, आणि भगवान शंकरांचा विवाह देखील महाशिवरात्रीच्या दिवशीच माता पार्वती समवेत झाला होता.
चला तर मग, आपण पाहूया कि, कालसर्प दोषाने ग्रसित लोकांनी कोणते असे महा-उपाय केले पाहिजेत. कि जे केल्याने त्यांचा कालसर्प दोष पूर्ण स्वरूपात संपून जाईल.
पहिला उपाय, सर्वप्रथम त्रयोदशे दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी नित्य कर्मातून निवृत्त व्हावे. व भगवान शंकरांना एका शुद्ध तुपाचा दिवा आपण अर्पित करायचा आहे,आणि हा दिवा अखंड ज्योतीचा असायला हवा, म्हणजे हा दिवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जळत राहिला पाहिजे. आपल्याला अधून-मधून या दिव्यामध्ये तूप घालत राहायचंय. दिवा सतत म्हणजे कमीत-कमी दुसऱ्या दिवसापर्यंत अर्थात चाथूर्दशीच्या सकाळपर्यंत जळत राहावा. आणि आपल्याला लावायचा केंव्हा आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी, अर्थात त्रयोदशीच्या सकाळी. यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचे आहे, व सर्व प्रथम आपल्याला शिवलिंगाला शुद्ध जलाने स्नान घालायचे आहे, म्हणजे जलाभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर शिवलिंगावर काळे तीळ अर्पित करायचे आहेत. काळे तीळ अर्पित केल्यानंतर, पुन्हा शुद्ध जलाने जलाभिषेक करायचा आहे. या नंतर शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पित करायचे आहेत. पांढरे तीळ अर्पित केल्यानंतर, पुन्हा शुद्ध जलाने जलाभिषेक करायचा आहे. व मनोभावे शिवलिंगाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि विनंती करायची आहे कि हे शिव शंकरा माझ्या कुंडलीतील किंवा मला जो कालसर्प दोष आहे, तो आपण समूळ संपवून टाकावा, म्हणून मी हा विधी करत आहे, तरी आपण माझी या दोषातून मुक्तता करावी, या दोषापासून माझे रक्षण करावे. मित्रानो हा झाला पहिला उपाय.
दुसरा उपाय, मित्रानो जर आपली आर्थिक परिस्थिती सक्षम असेल तर हा उपाय आपण करू शकता. आपण अगदी छोट्यासा असा सर्पांचा जोडा चांदीमध्ये बनवून घ्यायचा आहे. चांदी या धातूपासून बनविलेला सर्पांचा जोडा. तसेच एक छोट्यासा असा चांदीचा डमरू बनवून घ्यायचा आहेआणि एक छोटीशी चांदीची बिन म्हणजे आपण तिला पुंगी म्हणतो, हि बिन बनवून घ्यायची आहे. तसेच एक बेलपत्र चांदीचे बनवून घ्यायचे आहे. या चार वस्तू आपण शुद्ध चांदीच्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी छोट्या-छोट्या. आणि या चार वस्तू, आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला अर्पित करायच्या आहेत आणि शिव शंकरांना विनंती करायची आहे कि हे देवा राहू-केतू शी संबंधीत, कालसर्प दोषाशी संबंधित माझ्या जीवनामध्ये ज्या काही प्रकारच्या समस्या येत आहेत त्या तुम्ही संपवून टाका, मला आजीवन भरासाठी या समस्यांपासून स्वतंत्र करा. आजीवन मी या दोषातून मुक्त व्हावे. मित्रानो हा झाला दुसरा उपाय.
तिसरा उपाय. मित्रानो आपल्याला चार नारळ घ्यायचे आहेत. मित्रानो हे नारळ ओले म्हणजेच त्यामध्ये पाणी असलेले नारळ घ्यायचे आहेत, सुका नारळ घेऊ नये. व हे चार नारळ आपल्याला शिवलिंगाला अर्पित करायचे आहेत. मित्रानो एकाच वेळी हे चारही नारळ आपल्याला शिव शंकरांना अर्पण करायचे आहेत. व मनोभावे हातजोडून नमस्कार करायचा आहे आणि विनंती करायची आहे कि हे देवा राहू-केतू शी संबंधीत, कालसर्प दोषाशी संबंधित माझ्या जीवनामध्ये ज्या काही प्रकारच्या समस्या येत आहेत त्या तुम्ही संपवून टाका, मला आजीवन भरासाठी या समस्यांपासून स्वतंत्र करा. आजीवन मी या दोषातून मुक्त व्हावे.
मित्रानो हे काही साधे, सोपे व सहजरित्या करता येणारे उपाय आम्ही सांगितले आहेत. जे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता व कालसर्प दोषाचे निवारण करू शकता. तर मित्रानो नक्की हे उपाय करा.
|| शुभम भवतु ||