फॉरवर्ड मार्कस थुरामला रागाच्या भरात प्रतिस्पर्ध्यावर थुंकल्याबद्दल ३७ लाखांचा दंड आणि सहा गेम खेळण्यास बंदी- borussia monchengladbach forward marcus thuram gets six-game ban for spitting at opponent

0
27
forward marcus thuram
forward marcus thuram

फॉरवर्ड मार्कस थुरामला रागाच्या भरात प्रतिस्पर्ध्यावर थुंकल्याबद्दल ३७ लाखांचा दंड आणि सहा गेम खेळण्यास बंदी- borussia monchengladbach forward marcus thuram gets six-game ban for spitting at opponent

नवी दिल्ली: फुटबॉलमध्ये अनेकदा दोन संघातील खेळाडूंमध्ये वाद, बाचाबाची आणि अनेकदा हणामारी देखील झाल्याचे आपण पाहिले आहे. पण फुटबॉल मैदानावर अशी एक घटना घडली आहे ज्याचा कोणीच विचार केला नसेल.

वाचा-दिल्ली कॅपिटल संघाने आयपीएल 2021 या हंगामात आपल्या नवीन कर्णधारांची घोषणा केली, कर्णधार रिषभ पंत 

बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात बोरुनिया मोनशेनग्लाबाखचा स्ट्रायकर मार्कस थुरम (marcus thuram ) ने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूसोबत असा काही व्यवहार केला ज्याचा कोणीच विचार केला नाही. सामना सुरू असताना मार्कस प्रतिस्पर्धा संघाच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर थुंकला. यानंतर जर्मन फुटबॉल महासंघाने त्याच्यावर पाच सामन्यांची बंदी घेतली आहे. ही बंदी जर्मन कप आणि बुंदेसलीगा स्पर्धेसाठी लागू असेल. त्याच बरोबर मार्कसवर एक सामन्याची बंदी लागू असेल जी २१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असेल. ही बंदी लागू करायची की नाही ते चांगल्या वर्तनावर अवलंबून असेल.

वाचा- Daily horoscope 31 march 2021 Wednesday | रोजचे राशी भविष्य ३० मार्च 2021

होफेनहीम संघाविरुद्ध शनिवारी झालेल्या या सामन्यात बोरुनियाने २-१ असा विजय मिळवला. त्यानंतर सोमवारी महासंघाने मार्कस थुरमवर ४० हजार युरो (५० हजार डॉलर/भारतीय चलनात ३७ लाख रुपये) इतका दंड केला. महासंघाने दंड करण्याआधी बोरुसिया संघाने थुरमवर एक महिन्याच्या वेतना इतका दंड केला आहे. त्याचा एक महिन्याचा पगार सामाजिक कार्यासाठी दान केला जाणार आहे.

सामना झाल्यानंतर मार्कस थुरम आणि प्रशिक्षकावर मोठी टीका झाली होती. शनिवारी रात्री उशिरा मार्कसने इस्टाग्रामवरून या घटनेबद्दल माफी मागितली होती. २३ वर्षीय मार्कस या वर्षी मे महिन्यात चर्चेत आला होता. तेव्हा जगभरात त्याचे कौतुक होत होते. त्याने अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयडच्या हत्येच्या घटनेनंतर आंदोलन उभे केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here