पापमोचनी एकादशी: कळत – नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती व धन प्राप्ती उपाय

0
57
papmochani ekadashi ka mahatva

पापमोचनी एकादशी – कळत – नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती व धन प्राप्ती उपाय

मित्रानो असे म्हंटले जाते कि पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने कळत – नकळत झालेल्या पापकर्मांच्या दुश्फळांपासून मुक्ती मिळण्या बरोबरच आपल्या मनोकामनांची इच्छा पूर्ती होते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. तर मित्रानो जाणून घेऊया पापमोचनी एकादशी चे महत्व व लाभ काय आहेत.

पापमोचनी एकादशी व्रत, पूजा विधी आणि महत्व.

पापमोचनी एकादशी दिवशी व्रत करणार्याने सूर्योदयापूर्वी स्नानादिक कार्यातून निवृत्त होऊन प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत षोडशोपचार पूजन करावे. पापमोचनी एकादशी च्या दिवशी फलाहारी व्रत केल्याने अनेक रोगांपासून देखील मुक्ती मिळते. पापमोचनी एकादशी दिवशी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ आशा तिन्हीवेळेला प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली पाहिजे व या दिवशी पूजेमध्ये ताज्या तुळशीच्या पानांचा प्रयोग केला पाहिजे.

पापमोचनी एकादशी व्रताचे नियम

पापमोचनी एकादशी दिवशी चुकूनही कास्याच्या पात्रामध्ये किंवा भांड्यामधे भोजन करू नये. अंडी, मांस, मद्य, मसूर डाळ, चणे, भोपळ्याची भाजी व मध यांचे सेवन करू नये. तसेच या दिवशी शक्यतो आपण जमिनीवरती झोपायचे आहे, फार तर चटई अंथरून घेऊ शकता. पण शक्यतो जमिनीवर झोपायचा प्रयत्न करावा व कामवासनेचा त्याग करावा. या दिवशी कुठल्याही प्रकारची चुकीची कामे करू नयेत. मित्रानो जर का आपल्याला पान खायची सवय असेल, तर मित्रानो या दिवशी आपण पान देखील खायचे नाही आहे. व त्या बरोबरच खोटे बोलू नये, कोणाचीही निंदा करू नये, कोणाच्याही चाड्या करू नयेत, क्रोध करु नये, कोणालाही रागावू नये. व मित्रानो या दिवशी मीठ, साखर, तेल व अन्नाचे सेवन हि करू नये.

कळत – नकळत झालेल्या पापांपासून मिळते मुक्ती

पापमोचनी एकादशीचे व्रत करून प्रभू श्रीहरी विष्णूंना पंचामृताने ( पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध व साखर याना एकत्र करून बनविलेला पदार्थ ) अभिषेक घातल्याने मनुष्याद्वारे कळत – नकळत झालेल्या पापकर्मांच्या दुश्फळांपासून मुक्ती मिळते. या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने, व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते व त्याच बरोबर व्यक्तीचे जीवन सुखी आणि आनंदी बनते. या दिवशी शुद्ध अंतःकरणाने, मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीला कधी अडचणींचा, कष्टाचा सामना करावा लागत नाही.

  1. मित्रानो एकादशीच्या दिवशी व्रत करणार्याने सूर्योदयापूर्वी स्नानादिक कार्यातून निवृत्त होऊन व्रताचा संकल्प केला पाहिजे. व त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून प्रभू श्रीहरी विष्णूंची विधिवत षोडशोपचार पूजन करावे.
  2. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये भगवद कथेचा पाठ केल्याने घरामध्ये धन-धान्याची वृद्धी होते. भगवद कथेचा पाठ केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर वास राहतो.
  3. पापमोचनी एकादशी व्रत फारच लाभ दायक असते. शास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने १००० हजार गाई दान केल्याच्या समान पुण्याची प्राप्ती होते.
  4. मित्रानो पापमोचनी एकादशीच्या रात्री जागरण करण्याचे देखील फार मोठे महत्व आहे. पदमपुराणानुसार जे व्यक्ती पापमोचनी एकादशी चे व्रत करतात, त्यांच्यावर प्रभू श्रीहरी विष्णूंची असीम कृपा राहते.
  5. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने फलाहार केला पाहिजे. जर का आपण उपवास करण्यामध्ये सक्षम नसाल तर सात्विक भोजन करूनही आपण प्रभू श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकता.
  6. मित्रानो तसे पाहता हे व्रत आजीवन भरासाठी केले जाऊ शकते, पण स्वास्थ्य संबंधी तक्रारींच्यामुळे जर का तुम्हाला या व्रताचे उद्यापन करायचे असेल, तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी हवन करावे, व या हवाना मध्ये तीळ, जव आणि हवन सामग्रीची आहुती द्यावी.
  7. मित्रानो एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. पौराणिक धर्म ग्रंथानुसार माता शक्तीच्या क्रोधापासून वाचण्यासाठी महर्षी मेधाने शरीर त्याग केला होता. तेंव्हा त्यांचे शरीर पृथ्वीवर जवाच्या रूपामध्ये मिळाले होते. व त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे एकादशी दिवशी भाताचा उपभोग केला जात नाही.

जया एकादशी व्रत – सर्व मनोकामना पूर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here