Home Jotish धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी

धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी

धन प्राप्तीसाठी घरात या ठिकाणी ठेवा तुरटी.

मित्रांनो धनवान बनण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सापडतात. आणि त्यापैकीच एक अतिशय चांगला उपाय, आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मित्रांनो यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. तुरटी ज्याला हिंदीमध्ये फिटकरी असे म्हणतात, किंवा इंग्लिश मध्ये आलम या नावानेही ती ओळखली जाते. तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्याला नजर लागली, लहान बाळ असेल किंवा कोणीही, तर नजर लागली असेल तर हा तुरटीचा खडा घेऊन त्याच्यावरून जर सात वेळा उतरवला आणि नंतर तव्यावरती हा खडा ठेवून त्याला उष्णता दिली. म्हनजे तो जर गरम केला तर त्यामुळे नजर दोष उतरला जातो. म्हणजे नजर काढण्यासाठी या तुरटीचा वापर अगदी प्राचीन काळापासून होत आलेला आहे ज्या प्रकारे तुरटीचा खडा नजर दोष उतरवतो, अगदी त्याच प्रकारे या तुरटीचा वापर करून धन प्राप्तीचे योग निर्माण करता येतात. जर तुम्ही सुद्धा खूप मेहनत करत असाल मात्र पैशांची प्राप्ती होत नसेल महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नसेल तर मित्रांनो जाणून घ्या या पाठीमागे काही कारणे असू शकतात आणि त्यापैकी एक प्रबळ कारण असतं की आपल्या घरातील वास्तुदोष.

जर तुमच्या घरा मध्ये असेल तर त्यामुळेसुद्धा माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही तिचा आशीर्वाद घरच्यांना मिळत नाही आणि जर तुमचं दुकान असेल शॉप असेल किंवा कोणताही उद्योगधंदा असेल आणि त्या ठिकाणी जर नफा मिळत नसेल जर पैसा त्या ठिकाणी येत नसेल तर तुमच्या दुकानावर, तुमच्या शॉप वरती कोणीतरी काळी जादू करण्याची शक्यता असते किंवा कुणीतरी तंत्र मंत्र विद्यांचा वापर करून तुमच्या दुकानावरती मोहजाल टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर मित्रांनो ह्या सर्वांवरती एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून तुरटीचा वापर करता येतो तर हा वापर कसा करायचा आहे आज आपण पाहणार आहोत अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुमच्यावर लोन आसेल कर्ज असेल. आणि कर्ज फेडण्यामध्ये तुम्हाला फार मोठे कष्ट पडत असतील. तुम्ही प्रयत्न तर करताय, अगदी प्रामाणिक प्रयत्न करताय. पण या कर्जापासून जर तुम्हाला मुक्ती मिळत नसेल. कर्ज लवकर फिटत नसेल तरीसुद्धा या त्रुटी चा वापर करता येतो या सर्व प्रकारानं वरती तुरटी कशी वापरायची हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या घरा मध्ये असणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, जे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी तुरटीचा खडा बांधू शकता.

जे काही ग्रंथ आहेत जे वास्तुशास्त्राचे संबंधित त्या ठिकाणी घराचे जे प्रवेशद्वार आहे त्याच्या डाव्या बाजूला हा तुकडा बांधावा असा उल्लेख आढळतो. अगदी अपवादात्मक काही पुस्तक आहेत की जी उजव्या बाजूला हा खडा बांधावा असं सांगतात मात्र आमचा सल्ला असा राहील की आपल्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला, आपल जे प्रवेशद्वार आहे त्याच्या डाव्या बाजूला हा खडा आपण काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून तो लटकावून ठेवावा. तर मित्रानो हा झाला उपाय नंबर एक. असे केल्याने तुमच्या घरा मध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येणार आहे त्यापासून तुमचा बचाव होईल, तुमच्या घराचा बचाव होईल, तुमच्या घरा मध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही. मित्रानो दुसरी गोष्ट, आपल्या घरातील जेवढ्या खोल्या आहेत, जेवढ्या रुम्स आहेत त्या प्रत्येक खोली मधे एक एक फिटकरी म्हणजे त्या तुरटी चा तुकडा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये ठेवा. कोणताही भांडे घ्या, एखादी वाटी घ्या एखाधा बाउल घ्या आणि त्यामध्ये एखादा मोठा तूकडा तुरटीचा ठेवा. प्रत्येक रूममध्ये हा खडा आपण ठेवायचंय. कोणत्याही कोपऱ्यात. या ठिकाणी दिशेला महत्त्व नाहीये. फक्त प्रत्येक रूममध्ये एकेक खडा असावा इतकच याचं महत्त्व आहे. मित्रांनो या मुळे काय होतं की त्या-त्या रूम मधला वास्तुदोष हा फिटकरी चा तुकडा शोषून घेतो आणि तुमच्या घरातील संपूर्ण वास्तू दोषा पासून तुमचा संरक्षण होतं तुमच्या घरा मध्ये माता लक्ष्मीला येण्यास मार्ग मोकळा होतो घरामध्ये पैसा टिकू लागतो येऊ लागतो.

विनाकारण खर्च टाळतात. तसेच घरातील लोकांच स्वास्थ्य, आरोग्य सुद्धा यामुळेचांगलं राहत. मित्रानो उपाय नंबर ३. आपल्या घरातले बाथरूम असेल आणि टॉयलेट असेल, बाथरूम आणि टॉयलेट या दोन ठिकाणी काचेच्या भांड्यामध्ये, लक्षात घ्या बाथरूम आणि टॉयलेट या दोन ठिकाणी आपण जिवाटि आहे ती काचेची वापरायची आहे. काचेचं बाउल वापरायचे आहे. ग्लासची वापरायची आहे. तर या काचेच्या भांड्यामध्ये आपण एक-एक तुरटी चा तुकडा ठेवून दिलात तर यामुळे सुद्धा तुमच्या संपूर्ण घरातील वास्तुदोष दूर करण्याची ताकद या बाथरूम बाथरूम टॉयलेट मध्ये ठेवलेल्या तुरटीचा तुकड्यांमध्ये आहे तर हा सुद्धा उपाय आपण करू शकता यामुळेसुद्धा खूप फायदे होतात. मित्रानो पुढचा उपाय तुमचे दुकान आहे शॉप आहे तुमचं काही उद्योग उद्योग धंदा ज्या ठिकाणी आहे त्यासाठी ऑफिस आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील डील्स होता होता जर का कॅन्सल होत असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळता मिळता राहत असेल तर लक्षात घ्या तंत्र मंत्र विद्या चा वापर करून आपल्यावरती कोणीतरी काळी जादू करण्याची शक्यता असते. आणि अशा वेळीसुद्धा वेळी सुद्धा आपण आपल्या ऑफिसच्या किंवा जो काही उद्योग धंदा आहे त्या उद्योगधंद्याच् जे मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी तुमची एन्ट्री आहे. मी गेट ची गोष्ट करत नाही आपलं गेट नव्हे आपले ऑफिसची मुख्य एन्ट्री असेल किंवा जेथे उंबरठा असतो ती चौकट असते त्या चौकटीच्या ठिकाणी डाव्या बाजूला काळ्या कापडामध्ये बांधून आपण ही फिटकरी, ही तुरटी बांधून ठेवू शकता यामुळे सुद्धा खूप फायदे होतात ज्याने काही तंत्र मंत्र

केले असेल काळी जादू केली असेल त्याचा प्रभाव तात्काळ कमी होतो तुम्हाला अगदी पहिल्या दिवसापासून याचे फायदे, याचे शुभ परिणाम दिसू लागतात. मित्रानो पुढची गोष्ट, ज्या लोकांवरती कर्ज आहे आणि कर्ज फेडन्या मध्ये अडचण येत आहे अगदी हप्ता सुद्धा वेळेवर जात नाही. अशा लोकांसाठी. मित्रानो यासाठी आपण तीन बुधवार हा उपाय करायचा आहे. उपाय कसा आहे लक्षात गया. आपले जे खायचे पान असतं नागिनीचे पान म्हणतो आपण, असे खायचे एक पण आपण घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडसं कुंकू टाकायचे, देवघरात देवाचं जे कुंकू आहे ते कुंकू, एक चिमूटभर कुंकू आपण टाकायचे आहे आणि त्याच्यावर ती फिटकरी चा तुकडा ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि असं हे पान दोऱ्याने बांधायचं आहे किंवा दोऱ्याने जरी तुम्ही हे पान बांधलं नाहीतरी गुंडाळायचे आहे. आणि हे पान घेऊन जायचय एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली. ठीक आहे आणि त्या ठिकाणी जाऊन एखाद्या मोठ्या दगडाखाली हे पण तुम्ही ठेऊन द्यायांचं,ठेवायचं म्हणजे दाबायचं, एक मोठा दगड त्यावरती ठेवायचा आहे आणि असं केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणाहून परत आपल्या घरी घेऊन यायचे आहे, कोणाशीही न बोलता. लक्षात ठेवा हा उपाय करताना आपल्याला कोणीही रस्त्यामध्ये भेटू नये, दिसू नये याची काळजी आपण घ्यायची आहे, आणि मागं, मागे न वळता न बघता आपण सरळ आपल्या घरामध्ये यायचा आहे आपले हात पाय धुवायचे आहेत फ्रेश व्हायच आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्या इतर सदस्यांशी चर्चा कशी बोलू शकता.

तर मित्रानो हा उपाय हा अतिशय सिद्ध उपाय आहे यामुळे अगदी मोठ्यात मोठी धनाची समस्यासुद्धा सुटते आणि कर्जापासून सुद्धा आपला बचाव होतो. तर मित्रानो अशा प्रकारे अनेक उपाय या तुरटीचे करता येतात, तुरटी वास्तुदोष निवारण करते आणि तुमच्या घरा मध्ये धन-धान्य आणि संपत्तीचा ओघ वाढविते. तर मित्रानो आम्हाला आशा आहे की तुम्हाला या उपायानं पासून नक्कीच फायदा मिळेल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read