धन आणि तिजोरी कोणत्या जागी असावेत?

0
363
vastu shastra for tijori in marathi

धन आणि तिजोरी कोणत्या जागी असावेत? tijori vastu shastra in marathi, vastu shastra for tijori in marathi

नमस्कार मित्रानो, मित्रानो घरामधील धन व पैसे यांची वृध्दि करण्याच्या विषयावरची माहिती आज आम्ही आपणां सर्वाना देत आहोत. मित्रानो आज जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, आपल्याकडे पैसे येने व टिकणे हा आहे. हे पैसे घरात किंवा दुकानात आपण तिजोरी मध्ये ठेवतो. तर मित्रानो हे धन वाढवण्यासाठी आपल्या घरामधील धन ठेवण्याची जी जागा आहे, किंवा आपण तिजोरीत धन ठेवत असाल तर या तिजोरी ठेवण्याच्या जागे विषयी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, आवर्जून हे बदल आपण आपल्या घरामध्ये करावेत. ज्यमुळे आपल्या ध्यानामध्ये नक्कीच वाढ होईल.

प्राचिन काळापासून घरातील मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी तिजोरी बनवली जात आहे. बदलत्या काळानुसार यामध्ये परिवर्तन आले. कारण आता पैसा आणि दागिने बँकेत ठेवले जातात. परंतु जर तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवू इच्छिता तर या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तर मित्रानो जाणुन घेऊया तिजोरी संबंधीत काही खास गोष्टी.

 1. पैसे (धन) हे पैशाला पाहून वाढतात त्यासाठी तिजोरीत पैसे दिसतील अशा पद्धतीने एक आरसा आपण लावावा.
  (जसे श्री तिरूपति श्रीबालाजीच्या मुर्ति समोर व पैसाच्या हुंडी समोर अरसा आहे आज भक्त व पैसे येण्याचा तुलनेत तिरूपति बालाजी विश्वात अव्वल स्थान आहेत आणि आरसा हा दक्षिण दिशाला तोड करून असु नये)
 2. वर्षातून एकदा तरी श्री तिरूपति बालाजी ला जाऊन दर्शन करावे, याने व्यापार व नौकरीमध्ये निश्चितच फायदा होईल.
 3. वास्तु प्रमाणे धनाचे देवता कुबेरचा वास उत्तर दिशेत असतो. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेमध्ये पहिजेतिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडणे लाभदायक असते.

मित्रानो तिजोरी ही कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो ते पाहूया.

 1. ईशान्य कोपर्‍यात :- धना नाश होतो, ईशान्य कोपऱ्यामध्ये तिजोरी ठेवल्याने आपल्या घरामधील धन नाश होते, ते नकोत्या कारण साठी, अनाठायी खर्च होते, धनाचा अपव्यय होतो.
 2. अग्नेय कोपर्‍यात:- अनावश्यक धन खर्च होतो, अग्नेय कोपर्‍यामध्ये तिजोरी ठेवल्याने आपल्या घरामधील धनाचा अपव्यय होतो, अनाठायी खर्च होतो, पैसे अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होतात. अचानक मोठे खर्च उद्भवतात.
 3. दक्षिणेकडे तोड करून :- आजारपणावर धन खर्च होतो, मित्रानो दक्षिण दिशेकडे तोंडकरून तिजोरी ठेवल्याने आपल्या घरामधील धन आजारपणावर खर्च होते.
 4. नैऋत्य कोपर्‍यात :- हळू हळू धन निश्चित वाढेल, नैऋत्य कोपर्‍यामध्ये तिजोरी ठेवल्याने आपल्या घरातील ध्यानामध्ये निश्चितच वाढ होते.
 5. पश्चिमेकडे तोड करून :- धन टिकनार नाही, पश्चिमेकडे तोड करून तिजोरी ठेवल्याने आपल्या घरामध्ये धन टिकत नाही.
 6. वायव्य कोपर्‍यात :- भरमसाठ धन खर्च होतो. वायव्य कोपर्‍यामध्ये तिजोरी ठेवल्याने आपल्या घरामधील धनाचा भरमसाठ खर्च होतो. आपण म्हणातोना कि पैशाला वाट फुटते, असे काहीसे होते.
 7. उत्तर दिशेत उत्तर तोड करून:- सर्वात उत्तम (लाभच लाभ होईल) उत्तर दिशेला तोंड करून तिजोरी ठेवल्याने लाभच लाभ होईल. उत्तर दिशा हि तिजोरी ठेवण्यासारही सर्वात उत्तम आहे. या मुळे तिजोरीही नैऋत्य दिशेत उत्तर दिशाला उघडनारी असावी.
 8. उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य किंवा पूर्व देशेला तिजोरी ठेवू शकता.

मित्रानो गल्यात किंवा तिजोरीत पैसे व धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्या शुभवस्तु ठेवाव्या ते पाहूया.

 • श्रीमहालक्ष्मी यंत्र, व श्रीविष्णु ची प्रतिमा (जेथे श्रीविष्णुचा वास असेल तिथे श्रीलक्ष्मी येणार हे निश्चित) व श्रीयंत्र ठेवावे.
 • श्रीकुबेर यंत्र, श्री कुबेर मुर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व २ गज ( हत्ती) ठेवावेत.
 • मांजरीची ज्वार (ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्लं जन्म दिते तेव्हा एक नाळ बाहेर पडते त्याला ज्वार असे म्हणतात हे ज्वार लक्ष्मी युक्त व पैसा, धन, सोने, याना आकर्षित करण्यासाठी महत्वाची असते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ वस्तूआहे)
 • तिजोरीमध्ये आरसा, चंदनाच लहानसे खोड,सियार सिंग, हातजोडी, इद्रजाल, कस्तुरी, अत्तर(हिना नावाचे अत्तर) हे सर्व श्रीलक्ष्मीला प्रिय वस्तु तिजोरीत ठेवाव्यात. या वस्तू मुळे तुमचे पैसे कोणा कडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नौकरीमध्ये प्रगती होईल.
 • तिजोरीत एक मोती व दक्षिणवर्ती शंख ठेवावेत. समुद्र मंथनावेळी मोती आणि शंख हे दखल माता लक्ष्मीच्या बरोबर प्राप्त झाले होते. त्यामुळे याना माता श्रीलक्ष्मी चे भाऊ मानले गेले आहेत.
 • ज्या ठिकाणी सहज कोणाचेच लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा. तिजोरी संबंधीत माहिती घरातील खास लोकांनाच असावी. इतर लोकांना माहिती असू नये.
 • एखाद्या केस संबंधीत कगदपत्र पैसे किंवा दागिण्यांसोबत ठेवू नये. यामुळे हाणी होऊ शकते.
  तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये. यामध्ये नेहमी काही ना काही ठेवले पाहिजे. ज्यामुळे त्याची सार्थकता कायम राहिल.
 • देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी-गल्ला किंवा पैसे ठेवू नये. अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहिल आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही.
 • रोज घरात सकाळी श्रीविष्णु सहस्त्र नाम व श्रीसूक्त म्हणावे किवा ऐकावे.
 • दर शुक्रवारी (सकाळी,संध्या,रात्री केव्हाही एकदा)
  श्रीलक्ष्मी सहीत कुबेर म्हणजे तिजोरीची पुजा करवी. पुजा चालू असताना गुगळा चा धुप(धुर) करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य विलायची, लवंग,बासुंदी, तांबूल, याचा नैवेद्य दाखवावा व(जय लक्ष्मी माता)ही आरती करवी. व
  सकाळी आंघोळीआधी धन अथवा पैसे स्पर्श नये. कृपया सर्वांनी हे नियम पाळावेत. यामुळे निश्चितच श्रीलक्ष्मीचा वास तुमचा वास्तु मध्ये राहिल.

तर मित्रानो हि होती आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रा प्रमाणे धन व तिजोरी ठेवण्याची जागा कोठे असावी याविषयीची माहिती. वास्तुशास्त्रा आपल्या तिजोरीची जागा बदलून आपण हि आपल्या आयुष्यामध्ये धनाची भरभराट करू शकता. आपले आयुष्य यामुळे नक्की सुखकर होईल. विडिओ कसा वाटलाआवश्य कळवा, धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here