द गर्ल ऑन ट्रेन – प्रदर्शित २६ फेब्रुवारी 2021
रिभू दास गुप्ता यांनी दिग्दर्शन केलेल्या परिणीती द गर्ल ऑन ट्रेन या चित्रपटातून परिणीती चोप्रा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म नेट फ्लिक्स वर हा चित्रपट २६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच नेटफ्लिक्स ने आपल्या ट्विटर अकाउंट वर या चित्रपटाचा टिझर रिलीझ केला. चित्रपटाच्या पोस्ट कॅप्शन मध्ये नेटाफिल्क्स ने लिहिले आहे ” आत्ता पर्यंत कधीच अनुभवला नसाल अशा रेल्वे प्रवासात परिणीती चोप्राला जॉईन व्हा. वॉर्निंग: ट्रेन मध्ये या पण स्वतःच्या रिस्क वर !”.
या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा ने दारूच्या आहारी गेलेल्या मीरा या घटस्फोटित महिलेची भूमिका साकारली आहे.
मीरा (परिणीती चोप्रा) हिला रोज ट्रेन मधून दूरवरचा प्रवास करावा लागत असताना ती एका जोडप्याच्या जीवनावर परिपूर्ण अवलंबून असते व एके दिवशी प्रवास दरम्यान एक अशी गोष्ट तिच्या नजरेस पडते कि ज्या मुले तिला प्रचंड धक्का बसतो. ती एका बेपत्ता व्यक्तीच्या चौकशीत अडकते.या प्रवासा मध्ये ती या घटनेचे सत्य उलघडण्याचा प्रयत्न करते. द गर्ल ऑन ट्रेन हा चित्रपट पॉला हॉकिन्सन यांच्या २०१५ मधील बेस्ट सेलिंग पुस्तकाचे रूपांतर आहे. चित्रपटात अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी यांचाही भूमिका आहेत. हॉलिवूड अभिनेत्री एमिली ब्लण्ट हिच्या द गर्ल ऑन ट्रेन या थ्रिलर चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे.
परिणीती चोप्रा या चित्रपटातून चित्रपट सृष्टीमध्ये पुनरागमन करत आहे. २०११ मध्ये तिने रोमँटिक कॉमेडी असलेल्या लेडीज व्हर्सेस रिकी भाई या चित्रपटामधून सुपोर्टींग ऍक्टर म्हणून रणवीर सिंग याच्या बरोबर डेब्यू केले होते. या १० वारशाच्या कारकिर्दीत तिच्या करियर मध्ये बरेच चढ उतार येऊन गेले. तिचे काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपट बॉक्स ऑफिस वर डब्बा गोल झाले. पण सातत्याने करियर साठी परिश्रम घेणाऱ्या परिणितीला तिच्या या आगामी चित्रपटात भरपूर यश येवो हीच सदिच्छा!.
कास्ट –
परिणीती चोप्रा ऍज मीरा
अदिती राव हैदरी
कीर्ती कुल्हारी
अविनाश तिवारी
तोता रॉय चौधरी
शमवून अहमद
हितेंन पटेल ऍज डॉक्टर डेविड
रिची लावरील ऍज वॉल्टर
सॅमी जोनास हेणेय ऍज रईस लोन्स्लोव
निशा आलिया ऍज पिया
इशिता दत्ता ऍज इशिता शर्मा
वत्सल शेठ ऍज राजीव आर्य
विशाखा वादंगाम ऍज ऑफिसर कुणाल यशवर्धन
नताशा बेंटोन ऍज अंजली
मॅथ्यू पार्क ऍज द ट्रेन क्लावन
दिग्दर्शक – रिभू दासगुप्ता
संगीत – प्रीतम
निर्माती कंपनी – रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट
वितरक – नेटफ्लिक्स
प्रदर्शित तारीख – २६ फेब्रुवारी २०२१
भाषा – हिंदी