तांडव – जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त परफॉर्मन्स
सैफअली खानची वेब सिरीज तांडवची प्रतीक्षा, प्रेक्षक बऱ्याच काळा पासून करत होते. हि वेब सिरीज आता ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने पोलिटिकल ड्रामाला सगळ्यात मोठा विषय म्हणून निवडले आहे, आणि यावर आधारित नव्या मनोरंजक धारावाहिक कन्टेन्ट बनविणारे आपल्यासाठी घेऊन येत आहेत. मिर्जापुर, पाताल लोक, इनसाइड एज आणि अन्य सिरीज नंतर सैफअली खान स्टारर शो तांडव रिलीज झाली आहे. प्रेक्षक हा शो बघण्याची उतावीळपने वाट पाहत होते. तथापि, आता ते प्रदर्शित झाले आहे, ही बाब वेगळी आहे.
काय आहे तांडवाची कथा?
तांडव हि कथा आहे समर प्रतापसिंह (सैफअली खान) नावाच्या एका व्यक्तीची, जो पंतप्रधानांचा मुलगा आहे, आणि सत्ता आपल्या हातात मिळविण्यासाठी काहीही करू शकतो. समर चलाख आहे, भ्रष्ठ आहे,आणि खतरनाक देखील. त्याच्या सोबत आहे गुरपाल (सुनील ग्रोवर) जो मालकांसाठी काहीही करण्यास तयार आहे आणि शहरातील सारे लोक त्याच्या मुठीत आहेत. गुरपाल निर्दयी आहे व त्याला त्याच्या कृत्याचा कधी पश्चाताप होत नाही. तो कोणालाही जीवे मारू शकतो व काहीही अघटित करणे त्याच्यासाठी मर्यादेच्या बंधनात नाही.
समरचे वडील तीन टर्म पासून देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि आता पुन्हा एकदा निवडणूक जिंकणार आहेत. परंतु प्रधानमंत्रीपदाच्या सिंहासनावर कब्जा मिळविण्यासाठी समर एक सापळा रचतो. पण परिस्थिती तेव्हा हाताबाहेर जाते जेंव्हा समर आपल्याच रचलेल्या सापळ्यात अडकायला लागतो. परंतु तो आपल्या प्रयत्नांनी त्यातून बाहेर येतोय.
आपण नेहमी ऐकले आहे की सत्तेचा खेळ, राजकारण हे सामान्य लोकांचं क्षेत्र नव्हे. इथे येण्यासाठी मनुष्यामध्ये काहीही करण्याची हिम्मत असायला हवी आणि इथे टिकाव लागण्यासाठी त्याचे भ्रष्ठ व निर्दयी असणे जरुरी आहे. याच विचार धारेवर तांडवची निर्मिती झाली आहे. लेखक गौरव सोळंकी आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी याच गोष्टींना आपल्या शोचा आधार बनवून कथानकाला पुढे घेऊन जात आहेत.
हे कथानक संथपणे पुढे चालत आहे, ते इतक्या धीम्या गतीने कि काही वेळेला तुमचे ध्यान भटकू शकते. त्यामुळे आपण धैर्य राखणे जरुरीचे आहे, कारण शो मध्ये बघण्यासाठी बरेच काही आहे. हा शो उत्तम आहे. याचे कथानक आपल्याला बऱ्याच गोष्टीची आठवण करून देते पण तरीदेखील या मध्ये काहीतरी वेगळेपण आहे.
शो मधील कलाकारांचा परफॉर्मन्स
परफॉर्मन्स चा विचार केला तर एक घायाळ वाघ बनलेल्या सैफअली खानची डरकाळी पाहण्याजोगी आहे. सैफ ने स्वतः हि गोष्ट मान्य केलीय कि त्यांना डार्क पात्र साकारण्यात मजा येते आणि हे सत्य आहे कि ते यामध्ये काम हि उत्कृष्टरित्या करतात. तांडव मध्ये हि त्यांचे पात्र पाहण्यासारखे आहे. सैफचे सोबती बनलेले सुनील ग्रीव्हर ने गुरुपाल चे पात्र अत्यंत उत्कृष्टरित्या साकारलं आहे. पूर्ण सिरीज मध्ये एक अशी व्यक्ती जी सर्वांमध्ये खतरनाक आहे व केव्हा काय करेल आणि जिची सर्वाना धास्ती लागून राहिलेली असते ती आहे सुनी ग्रोव्हर ने साकारलेले गुरपाल हे पात्र. त्याच बरोबर गुरपाल हे सुनील साठी मोठी व्यक्तिरेखा बदल पात्र आहे.
डिम्पल कापडियाने देखील या सिरीज मध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या सोबत तिग्मांशु धुलिया, अनूप सोनी, गौहर खान ने आपल्या व्यक्तिरेखा चांगल्या रीतीने साकारलेल्या आहेत. कुमुद मिश्रा चा अभिनय आपण जशी पाहिलीय, तांडव मध्ये त्यापेक्षा काही कमी नाही. या सर्वांव्यतिरिक्त जिशान अयुब ने त्याचे पात्र चांगले वठविले आहे. एक निडर आणि इमानदार विध्यार्थ्यांच्या रूपाने जिशानने कमाल केली आहे. या सर्वांव्यतिरिक्त आणिखीन बरेच ऍक्टर्स या शो मध्ये सपोर्टींग रोल मध्ये आहेत व त्यांनी त्यांची पात्रे उत्तम साकारली आहेत.
दिग्दर्शक अली अब्बास जफर ने हा शो बॉलीवूड स्टाईल ने बनविला आहे. हि सिरीज जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्स नि भरलेली आहे, फक्त तुम्हाला थोडा संयम राखण्याची गरज आहे. सुरवातीच्या एपिसोडमध्ये भलेही तुम्हाला वाटो कि हे काय होतंय आणि का होतंय, पण नंतर गोष्टी एकमेकांशी जुळायला लागतात व आपणही शो सोबत जुडायला लागता. एकंदरीत तांडव हि सिरीज उत्कृष्ट आहे.