जप माळेचे नियम

0
116
japa mala mantra

जप माळेचे नियम

नमस्कार मित्रानो, मित्रानो अध्यात्मशास्त्रा नुसार काहीजण कुठल्या ना कुठल्यातरी दैव-देवतेचा मंत्र पाठ, जप हा करतच असतो. आणि हा जप कुठल्या ना कुठल्यातरी माळेवर करत असतो. मित्रानो आजचा आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे आपण जो माळेवरती जप त्या संदर्भातले नियम धर्मशास्त्रामध्ये, अध्यात्मशास्त्र मध्ये काय काय सांगितलेले आहेत, त्या विषयीची माहिती आज आपण थोडीशी घेणार आहोत. मित्रानो कुठल्या ना कुठल्यातरी माध्यमातून आपण ज्या वेळेला जप करत असतो त्या वेळेला माळेवरती हात जप करत असतो.

आणि हा जप फक्त हिंदू धर्मामध्ये नाही तर प्रत्येक धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा माळेवरच केला जातो. त्याचे दोन तीन अध्यात्मिक फायदे आहेत त्याचप्रमाणे आत्ताचे आधुनिक शास्त्रीय फायदे सुद्धा आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला जप करत असतो त्यावेळेला आपल्या बोटांची एक विशिष्ट अशा प्रकारची मुद्रा होत असते. आणि या मुद्रेला, मुद्रा विज्ञान शास्त्रामध्ये सुद्धा शरीराच्या विविध अंगांवरती, विविध पेशींवरती याचा खूप चांगला परिणाम होत असतो. मित्रानो हा झाला थोडासा विज्ञानाचा भाग.

आता आपण पाहूयात कि हे जप करत असताना, त्याचे नियम काय-काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा नियम जो  आहे तो म्हणजे माळ जप करतेवेळी कधीही, आपल्या पाच बोटं पैकी पहिल्या बोटाचा जिला हस्तरेखा शास्त्रामध्ये तर्जनी असे देखील म्हटले जाते. तर या बोटाचा, दर्शनी बोटाचा भाग कधीही माळेला स्पर्श करायचा नसतो.  म्हणजेच पहिलं बोट वाघळून नेहमी माळेतील मणी हे आपण मागे ओढत असतो. अशा पद्धतीने आपण माळ जपत असतो.

मित्रानो दुसरा नियम असा आहे, कि ही जी मण्यांची माळ असते त्याच्या मधे सगळ्यात वरच्या बाजूला एक मणी असतो त्याला मेरुमणी असं म्हटलं जातं आणि या मेरुमणी पासूनच त्याच्या पुढे असलेल्या मनिपासून 108 मनी एकंदरीत एका माळेमध्ये ओवलेले असतात. आणि या १०८ मण्यांची माळ आपण जप  करत असतो.  त्या वेळेला हा मेरुमणी मात्र जप संख्येमध्ये धरला जात नाही. किंवा जपाच्या वेळसुद्धा मेरुमणी च्यावरती जप करायचा नसतो. तर तेथून सुरुवात करायची असते त्याच्या पुढच्या असलेल्या मण्यांपासून. म्हणजे आपण अशाप्रकारे जप करू शकतो.

श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही पाहिल असेल की आपण पहिल्या बोटाचा स्पर्श करत नाहीये. उरलेली हि जी तीन बोटे आहेत, त्यातल्या रवीच्या बोटा वरती आपली माळ स्थिर होते, रवीच बोट म्हणजे शेवटून दुसरं बोट ज्याला आपण अनामिक अंगुली किंवा रिंग फिंगर असे देखील म्हणतो. तर रवीच्या या बोटावरती आपली माळ स्थिर होते.आणि मधलं बोट, मध्यमा आणि अंगठा याच्या माध्यमातून आपण हे माळेचे मणी मागे ओढत असतो आणि अशाच पद्धतीने हा जप करायचा असतो.

ज्यावेळेला हि माळ पूर्णपणे ओढून संपते. म्हणजे 108 मान्यांपर्यंत आपण जप करता येतो, त्या वेळेला आपण जर पुढची अजून एक माळ जप करणार असू, तर मेरुमणी मात्र ओलांडून पुढे जायचं नसतं. म्हणजे आपला जप संपत आल्यानंतर माळेवरती  श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम नंतर मेरुमणी आपल्याला ओलांडायचं नाहीये. तर त्याच माळेच्या शेवटच्या मन्यापासून पुन्हा माळ उलटी फिरवायची आणि जप करायला सुरुवात करायची. आणि अशा रीतीने आपण जप करत करत पुन्हा मागे यायचं.

अर्थात नियम पुन्हा तोच. मला जर जप माळेवरती करायचंय,  2 माळा, 5 माळा, १० माळा  तर पुन्हा एकदा मेरुमण्यावरती आल्यावर, त्याच्यावर ओलांडून पुढे जायचं नाही तर तिथून पुन्हा मागे फिरून, माळ आपण उलटी फिरवून परत घ्यायची असते. हा अत्यंत महत्त्वाचा नियम.  मित्रानो दुसरा महत्वाचा प्रश्न बरेच जण विचारतात कि, रुद्राक्षाची माळ चांगली, स्फटिकाची माळ चांगली, तुळशीची माळ चांगली. कि कुठल्या माळेचा, कुठल्या देवतेचा आणि कुठल्या जपाचा काय संबंध आहे. त्याची आज आपण थोडीशी माहिती घेऊया.

मित्रानो जेंव्हा आपण गुरु दीक्षा घेतो. गुरूकडून जप किंवा जपाची दीक्षा घेतो. त्यावेळेला जी काही आपण माळ घेतलेली असेल किंवा विशेष करून तुळशी माळेवरती आपण गुरूचा जप घेऊ शकतो. त्याच प्रमाणे लक्ष्मीकारक मंत्र आपण ज्या-ज्यावेळी म्हणत असतो. त्या मंत्रांची ऊर्जा अजून चांगल्या प्रकारे जेव्हा वाढवायची असते, त्यावेळेला अर्थातच लक्ष्मीला प्रिय असलेली हि कमळ बीज, या कमल बीजांपासून तयार केलेली, काहीजण याला कमल गट्टा असेसुद्धा म्हणतात. या कमल बीजांवरती सुद्धा आपल्याला जप करता येतो. हीच ती कमळ बीजांची माळ. १०८ कमळ बीजांची हि माळ  असते याच्या वरती आपण लक्ष्मी चे मंत्र जप करू शकतो.

त्याचप्रमाणे स्फटिकाच्या माळेवर सुद्धा जप करण्याची पद्धत आहे. स्फटिकाच्या माळेवर सुद्धा लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करता येतो. काही जण लक्ष्मीचा जप करण्यासाठी विशेष करून ही स्पटिका ची माळ वापरतात. परंतु या स्फटिकाच्या माळेवरती आपण कुठले जप करू शकतो. स्फटिकाचा सगळ्यात सुंदर उपयोग म्हणजे शरीरामध्ये असलेली उष्णता, हि उष्णता याच्या मध्ये असलेले मनी हे खेचून घेतात. त्यामुळे आपली उष्णता कमी होण्यास खूप चांगली मदत होते. आणि म्हणूनच ही माळ गळ्यामध्ये, अंगावरती वापरन सुद्धा फारच सुंदर आरोग्यकारक समजलं जातं.

मित्रानो शिवाच्या उपासनेमध्ये, पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमः शिवाय आणि षडाक्षरी मंत्र म्हणजेओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप विशेष करून शिव आराधनेमध्ये, शिव उपासनेमध्ये रुद्राक्षाची माळ बाजारामध्ये मिळते. या रुद्राक्षाच्या माळेवरती आपण शिव संदर्भात असलेली उपासना, मंत्र साधना करू शकतो. विशेष करून आपल्या कुलदेवतेचे जप सुद्धा नेहमी या रुद्राक्षाच्या माळेवरती केल्यास अनेक पद्धतीने फायदा होताना दिसतो.

मित्रानो आपले जेवढे कुलदैवत आहेत, शिवा उपासने मधले, उदाहरणार्थ खंडोबा, जोतिबा इत्यादी.  त्या कुलदेवते मध्ये शिवाचीच उपासना केली जाते. कारण कुलदैवत हे शिवाचेच  रूप मानले गेलेले आहे. आणि म्हणूनच आपल्या कुलदेवतेचा जप करते वेळी सुद्धा आपण अशा रीतीने रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करू शकतो. मित्रानो अशा रीतीने देवदेवतांच्या निरनिराळ्या पद्धतीच्या उपासना करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या माळांचा उपयोग करतो.  आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया की, लक्ष्मी कारक उपासना करत असताना कमल गट्टा म्हणजे कमळ बीजांची किंवा स्फटिकाच्या माळेचा उपयोग केल्यास फार उत्तम अनुभव येतो. विविध ग्रहांचे जप करत असताना किंवा आपल्याला गुरु स्थानातून मिळालेले जप करताना आपण कुठल्याही प्रकारच्या तुळशीच्या माळेचा   उपयोग करू शकतो. शिव उपासना किंवा कुलदेवतेच्या उपासना करते वेळी आपण रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केल्यास फार उत्तम अनुभव येताना दिसतो.

मित्रानो असाही म्हंटल जात कि माळेचा जप करतेवेळी तो कधीही उघड्यावर करू नये. म्हणजे असं, की माळेचा जप आपण चार लोकांमध्ये करत असताना कधीही हि माळ कोणाला दिसून देऊ नये, असे शास्त्रामध्ये सांगून ठेवलेल आहे. आणि हि माळ आपण शांतपणे जप करत असताना, ती दिसू नये म्हणून बाजारामध्ये विशिष्ट अशा प्रकारची एक पिशवी मिळते, जिला गोमुखी असं म्हणतात. हरे राम हरे कृष्ण पंथांमध्ये मंडळी ज्या पद्धतीने जप करतात, त्यांच्या गळ्यामध्ये ही पिशवी किंवा हातामध्ये ही पिशवी अडकवलेली दिसते. या पिशवीचं वैशिष्ट्य असे की, या पिशवीमध्ये माळ ठेवण्याकरता  मोठी जागा असते आणि आपलं पहिलं बोट माळेला स्पर्श करू नये म्हणून पहिलं बूट बाहेर काढण्यासाठी सुद्धा पिशवीला एका ठिकाणी जागा केलेली असते.

आणि अशा रीतीने आपण याच्या मध्ये माळ ठेवून जप केली, याला गोमुखी असं म्हणतात. तर या गोमुखी मधे माळ जप करत असताना ती कुणाला दिसू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. काही वेळेला आपण रस्त्याने चालत असताना सुद्धा जप  करू शकतो. त्यावेळी हि गोमुखी पिशवी आपण आपल्या हाताला बांधून आपण जप करू शकतो. त्यामुळे कुठल्याहि  प्रकारची अडचण सुद्धा येत नाही. त्याला खूप चांगल्या आशा प्रकारची लांब अशी दोरी  असल्यामुळे, आपण ती आपल्या गळ्यात अडकवून सुद्धा जप करू  शकतो. तर मित्रानो हि होती जप  करण्यासाठी माळेचा आणि गोमुखींचा उपयोग कसा करायचा याबद्दल माहिती. मित्रानो महती कशी वाटली ते अवश्य कळवा. धन्यवाद .

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here