चैत्र नवरात्रीमध्ये साधना उपासना कशी करावी | chaitra navratri puja vidhi 2021

0
36
chaitra navratri navami puja vidhi

चैत्र नवरात्रीमध्ये साधना उपासना कशी करावी

chaitra navratri puja vidhi 2021

नमस्कार मित्रानो, आज आपण माहिती घेणार आहोत चैत्र नवरात्र विषयाची. चैत्र नवरात्र कशी साजरी करावी आणि चैत्र नवरात्रीचे महत्त्व काय आहे. या नवरात्र उत्सवामध्ये देवी उपासकांनी नवरात्रीच्या कालखंडामध्ये कोणती साधना,उपासना करावी. आतापर्यंत कुणीही न सांगितलेली माहिती आपण आजच्या विडिओ मध्ये नवरात्र या विषयाच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका. मित्रानो आपण जाणून घेऊया चैत्र नवरात्रीचे चे महत्व काय आहे. घटस्थापनेचा मुहूर्त, उपासनेमध्ये काय आपल्याला पाळायचं आहे, उपासनेचे महत्त्व काय आहे इत्यादी. या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.

मित्रानो हिंदूंच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या शुभ दिवसापासून सुरू होते, त्याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुरू होत असतं. ते चैत्र नवमीपर्यंत म्हणजे राम नवमी पर्यंतच्या दिवसापर्यंत हे नवरात्र साजरे केले जाते. आपल्या मनोवांछित फळांची प्राप्ती होण्यासाठी या चैत्र नवरात्री मध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची साधना, उपासना करत असतो. मित्रानो ही माता देवी आपल्या सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये सदैव वास करत असते. पुण्यवान लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी च्या रूपामध्ये असते तर शुद्ध स्वभावाच्या व्यक्तींमध्ये ती बुद्धीच्या स्वरूपामध्ये वास करते. सद्पुरुषांमध्ये ही देवी ही श्रद्धेच्या स्वरूपामध्ये असते. तर कुलीन व्यक्ती आणि स्वभावाचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये लज्जेच्या स्वरुपात हि वास करत असते. भगवती सदैव अशा पद्धतीने सगळ्या भक्तांच्या मध्ये वास करते. नवरात्र उपासना ही आद्य शक्तीच्या रूपाची उपासना, साधना मानली गेली आहे. एकूण चार नवरात्र वर्षभरामध्ये येत असतात. चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ महिन्यातल्या नवरात्र. यातील दोन नवरात्र ह्या गुप्त असतात. तर दोन नवरात्र ह्या प्रगत नवरात्र म्हणून ओळखल्या जातात. त्यातली चैत्र नवरात्र म्हणजेच वासंतिक नवरात्र आणि अश्विन नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र म्हणून आपण तीला ओळखतो. चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी रामनवमी असते म्हणून या नवरात्रीला काही ठिकाणी राम नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जात. हि नवरात्र सुरु होते गुढीपाडव्याच्या शुभ दिवसावरती, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आणि शेवट हा नवमीच्या दिवशी होतो. त्या दिवशी त्रेता युगा मधील प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला दिवस असतो आणि म्हणून याला राम नवमी असे म्हणतात.

ज्यांनी समस्त जगाला, प्रत्येकाला आपल्या मर्यादांची म्हणजेच कर्तव्यांची ओळख करून दिली आणि आयुष्य कसे जगावे याचा आदर्श घालून दिला. आणि म्हणूनच त्यांना आपण मर्यादा मर्यादापुरुषोत्तम म्हणून ओळखतो. मित्रानो नवरात्रीचे महत्व सांगताना आद्य शंकराचार्य म्हणतात कि, त्यांच्या सौंदर्य लहरी ग्रंथांमध्ये ते सांगतात, की माता पार्वतीच्या विचारण्यावरून भगवान शिवशंकराने जेंव्हा तिला उत्तर दिलं होतं, तेव्हा सांगितलं होत कि, प्रत्येक नवरात्री हि देवीच्या नवशक्ती ने परिपूर्ण असून, नवरात्री मधील प्रत्येक नवरात्रीच्या, प्रत्येक दिवशी ह्या एक – एक शक्तीची आराधना, देवीच्या स्वरूपाची केली जाते. किंबहुना प्रत्येक देवी उपासकांनी हि नवरात्र उपासना, आराधना या माध्यमातून ती अवश्य करावी. संपूर्ण सृष्टीला संचालित, नियंत्रित करणारी ही आदिशक्ती म्हणजेच प्रत्यक्ष नवदुर्गा होय. आणि हे पावन पवित्र नवरात्र पर्व म्हणजेच हिंदू धर्म मान्यतेनुसार समस्त नारी शक्तीचा असलेला सन्मान आहे. यावेळीच चैत्र नवरात्र सुरू होत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा 13 एप्रिल 2021 आणि वार आहे मंगळवार. आणि या वेळच देवीचे वाहन जे आहे, हे मंगळवार असल्यामुळे घोडा आहे. ज्यांच्या घरामध्ये या नवरात्रीचा घटस्थापना केला जातो त्यांनी या वेळेला देवीची घटस्थापना 13 एप्रिल म्हणजेच पाडव्याच्या दिवशी सकाळी पाच वाजून 05:28 ते सकाळी दहा वाजून 14 मिनीटे या वेळेमध्ये करायचे आहे. मित्रानो हा शुभमुहूर्ता असणार आहे घटस्थापने करता. ज्यांच्याकडे घटस्थापना नसते परंतु जे लोक देवीचे उपासक आहेत त्यांनी या वेळेमध्ये सकाळी शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून कपाळावरती गंध लावून आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून देवीच्या कोणत्याही मंत्राचा पाठ पांढऱ्या शुभ्र वस्त्रा वरती बसून किंवा कोणत्याही वस्त्रा वरती बसून मंत्र पाठ करायचा आहे.

या वेळी आपण महालक्ष्मी अष्टक, दुर्गा स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, दुर्गा सप्तशती पाठ अशा कोणत्याही स्तोत्राचा पाठ करू शकता. किंवा अगदी देवीचा नवार्ण मंत्र ‘ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे’ या मंत्राचा जप सुद्धा आपण कुठल्याही माळेवरती 21 किंवा 108 माळा अवश्य या शुभमुहूर्तावरती पहिल्या दिवशी करू शकता. आणि त्यानंतर सलग नऊ दिवस हा पाठ पुढे सुरू ठेवू शकतात. देव्हाऱ्यामध्ये नऊ दिवस सतत दिवा जळत राहील असं तेलाचा दिवा म्हणजेच नंदादीप सुद्धा या नवरात्रीमध्ये आपण लावू शकता. तो विझणार नाही याची आपल्याला काळजी सुद्धा घ्यायचे आहे. तरीसुद्धा मित्रानो काही वेळेला हा दिवा विझतो. तर कुठलाही मनामध्ये वाईट विचार, भावना न आणता अगदी पुन्हा नव्याने, नवीन दिवा प्रज्वलित करावा. काही मनामध्ये आणू नये. जे लोक या नवरात्रीमध्ये उपवास करतात त्यांनी फलाहार किंवा दूध अवश्‍य घ्यावे. पण जेवणामध्ये मात्र मीठ घेऊ नये. ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी एक वेळा आहार घेण्यास बिलकुल हरकत नाही. काही जण या काळामध्ये रोज एका एका कन्येला भोजन देत असतात. कन्या भोजनाच महत्त्व नवरात्रीमध्ये फार मोठ समजल जात. या व्रताच्या काळामध्ये तामसीक आहार या नवरात्रामध्ये व वर्ज्य करायचा असतो. कांदा-लसूण, अतितिखट, मांसाहार पूर्णत वर्ज्य केल्यास अतिउत्तम. या काळामध्ये आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं असतं, भांडण करायचे नसतात बारीक-सारीक गोष्टी चिडचिड होते राग येतो या गोष्टी टाळायच्या असतात.

खोटं बोलायचं नसतं. शक्य तेवढे आपण मौन पाळायचं. स्वतःच्या मनावर, कामवासनेवर, इंद्रियांवर नियंत्रण आणण हा खरं तर मुख्य हेतू, अशा प्रकारच्या आपल्या साधनेमध्ये आणि उपासनेमध्ये असतो. हि शास्त्रीय बाजू माहिती करून आपण उपासना केल्यास त्याचे फळ निश्चित मिळतेच. परंतु देवतेच्या प्रति आपल्या ज्या प्रेम भावना असतात त्या अजून चांगल्या वाढायला मदत मिळते. आणि मनामध्ये भीती राहत नाही. कारण बऱ्याचदा आपण भीतीने साधन आणि उपासना करतो आणि मनी नाही भाव देवा मला पाव असा काहीसा प्रकार असतो. आणि त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नसतो. कारण मनाची भावजागृती करणं महत्त्वाचं. नवरात्रीमध्ये काम वासना वर्जित असून, काळे वस्त्र या काळामध्ये परिधान करून नयेत. अर्थात महाकाली जे उपासक आहेत ते मात्र काळे वस्त्र परिधान करू शकतात. या काळामध्ये काही ठिकाणी लिंबू कापलं जात नाही, तर काही ठिकाणी चामड्याच्या वस्तू, जसे आपले पैशाचं पाकीट, शूज, चप्पल ह्या सुद्धा या काळामध्ये काहीजण वापरत नाहीत. अर्थात मित्रानो व्रत, उपासना करत असताना आपल्याला जेवढे यामधील जमतं तेवढेच कराव दुसरं उगीच कोणीतरी काहीतरी करत आहे म्हणून आपण सुद्धा ते करावं असं बिलकुल समजण्याची गरज नसते. कारण शेवटी उपासना करण्यामागे आपली भावना आणि श्रद्धा ही फार महत्वाची असते. अशा उपासनेमध्ये पूर्णतः पवित्रता बाळगणं फार महत्त्वाच असत आणि मनाची पवित्रता फार महत्त्वाची असते.

विशेष करून हा नारी शक्तीचा सन्मान असण्याचा काळ असल्यामुळे आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया असतात त्यांचा सन्मान मात्र आपल्याला पहिल्यांदा ठेवायचा असतो. आणि इथूनच तर सुरुवात करतो आपण सन्मानठेवायला. खरतर हाच मुख्य हेतू असतो नवरात्रीच्या उपासना काळा मधला. तर मित्रानो अशाप्रकारे आपणदेखील नवरात्रीमध्ये देवीची साधना, उपासना करून तिची कृपाप्राप्त करू शकता. धन्यवाद…

||शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here