घरात या दिशेला नक्की लावा 1 आरसा – पैसा टिकून राहील तिजोरी पैशांनी भरून जाईल
मित्रांनो, वास्तुशास्त्र हे पंचमहाभूतांवर आधारित असलेल शास्त्र आहे. अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचमहाभूतांचा समतोल जर आपल्या घरात असेल आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी असेल दुकानात असेल तर मोठ्या प्रमाणात पैसा धन आपल्या घराकडे आकर्षित होतं आणि या उलट जर हे पंचमहाभूतं असमतोल असतील, अनबॅलन्सड असतील, तर अशा वेळी मात्र आपल्या घरात पैसा टिकत नाही लोक वारंवार आजारी पडतात. अशा घरातील लोकांचे मानसिक अस्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित न राहता, घरात सातत्याने चिडचिड होते. अशा घरात जास्त वेळ रहावसं वाटत नाही. चला तर जाणून घेऊया, कि या पंचमहाभूतांना जर समतोल करायचं असेल आणि आपल्या घरात धन वैभव सुख शांती निर्माण करायची असेल तर आपण कोणकोणत्या वास्तू नियमांचं पालन करायला हव. मित्रांनो सर्वात सुरुवातीला आपण आपला ईशान्य कोपरा पहा. ईशान्य दिशा कोणती? तर ज्या दिशेला सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा जो आहे. मित्रांनो आपल्या घराचा हा ईशान्य कोपरा सर्वाधिक महत्त्वाचा आहे या ईशान्य कोपऱ्यात जर टॉयलेट असेल किंवा अवजड साहित्य असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी, कबाड ज्याला म्हणतो, की भंगार साहित्य स्क्रॅप मटेरियल जर या कोपऱ्यामध्ये साठवलेलं असेल किंवा चप्पल चपलांचे स्टॅन्ड असेल, बुटांच स्टँड असेल ज्याला आपण शु रॅक म्हणतो.
तर मित्रांनो या वस्तू ईशान्य कोप-यातून ताबडतोब हटवा, कारण या ठिकाणी जर या वस्तू असतील, तर हा दैवीय कोपरा आहे. देवांचा कोपरा आहे, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दैवीय शक्ती आकर्षित होतात. आणि जेव्हा अशा निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणाऱ्या वस्तू या ईशान्य कोपर्यात असतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात वास्तुदोष निर्माण होतो आणि तुमच्या घरातील गरिबीचा तुम्ही जितकी मेहनत करत आहे तितका पैसा येत नाही घरामध्ये आजारपण आहे याचाही सर्वात मोठे कारण आहे मग प्रश्न असा आहे की हा ईशान्य कोपरा कसा असावा मित्रांनो ज्यांना शक्य आहे या ठिकाणी देवघर अवश्य स्थापित करा. दुसरी गोष्ट हा कोपरा स्वच्छ असावा मोकळा ढोकळा असावा कोणतेही अवजड साहित्य या ईशान्य कोपऱ्यात आपण ठेवायचं नाहीय. हि ईशान्य दिशा कुबेराची सुद्धा दिशा मानली जाते. कुबेर धन अधिपती आहेत आणि म्हणून हा कोपरा मोकळा ढोकळा ठेवायचा आहे. आणि जर आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र असेल तर त्याची सुद्धा स्थापना आपण या ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर दिशेला करू शकता सोबतच उत्तर दिशेला एक आरसा अवश्य लावा. मोठा लावला तर अति उत्तम होईल मित्रांनो हा उत्तर दिशेला लावलेला आरसा मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते या आरशाच्या प्रभावाने. दुसरी गोष्ट, आपण ज्या मेहनतीने पैसा कमावलेला आहे.
हा पैसा नक्की कुठे ठेवायचा अनेक जण कपाटात ठेवतात तिजोरीमध्ये ठेवतात किंवा आपला गल्ला वगैरे असेल तर मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा ठेवत आहात ती वस्तू म्हणजे तुमची तिजोरी तुमच कपाट नक्की कुठे असाव. मित्रांनो यासाठी आपली दक्षिण दिशा अत्यंत उत्तम आहे दक्षिण दिशेला जी भिंत आहे. त्या भिंती जवळ आपण हे कपाट ठेवाव किंवा तिजोरी ठेवावी आणि या तिजोरीचे तिजोरी जे तोंड आहे हे तोंड मात्र उत्तर दिशेला उघडणार असावं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल फायनान्शिअल स्टॅबिलिटी नसेल तर मित्रांनो अशा वेळी आपल्या घरातला साऊथ वेस्ट म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधली जी दिशा आहे. यांच्या मधला जो कोपरा आहे. की ज्याला आपण नैऋत्य कोपरा म्हणतो. मित्रानो या नैऋत्य कोपऱ्यात सुद्धा आपण आपली तिजोरी किंवा कपाट ठेवू शकता. मात्र लक्षात घ्या कपाट कुठे हि ठेवा दक्षिणेला ठेवा किंवा नैऋत्य दिशेला ठेवा, त्याच तोंड म्हणजेच या कपाटाच जे तोंड आहे, दरवाजे आहेत ते मात्र उत्तरेस उघडणारे असावेत. मित्रानो हि जर आपण काळजी घेतली, आणि अजून एक गोष्ट, या तुमच्या कपाटांमध्ये तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता मौल्यवान वस्तू ठेवता त्याच्या खाली एक लाल रंगाचा कपडा आवश्य अंथरा. लालभडक रंगाचा, मित्रांनो लाल रंग हा पैसा आकर्षित करण्यामध्ये धन आकर्षित करण्यामध्ये वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून आपण आपल्या देवघरात सुद्धा लाल रंगाचा कपडा अंथरून शकता सोबतच आपल्या तिजोरीत आपल्या कपाटात सुद्धा आपण हा जर लाल रंगाचा कपडा अंथरलात तर मोठ्या प्रमाणात धन आकर्षित होतं. पैशाने पैसा वाढू लागतो. मित्रांनो तुमचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरात ज्या रूममध्ये जातो मग तुमचा हॉल असेल, किचेन असेल ज्या ठिकाणी तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ असता ते ठिकाण हे स्वच्छ टापटीप असायला हवं अस्ताव्यस्त नसावा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ते काम करण्याची जागा जर स्वच्छ टापटीप असेल नीट नेटकी असेल तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात तुमची एकाग्रता साध्य होते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत. आणि आपोआप तुम्ही जे काही काम करता त्यातून पैशांची निर्मितीसुद्धा होत असते वास्तुशास्त्रातील अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा तो नेहमी सजवलेला असावा, स्वच्छ सुंदर असावा असं नसावं की त्या दरवाज्याला क्रॅक्स गेलेले आहेत तडे गेलेले आहेत किंवा दरवाजा उघडताना करकर अशा प्रकारचा आवाज येतोय मित्रांनो याच दरवाजातून धन पैसा सुख समृद्धी आपल्या घरात प्रवेश करणार आहे आणि म्हणून असा दरवाजा हा आवाज रहित असावा स्वच्छ सुंदर असावा छानस तोरण आपल्या चौकटीला असावं.
स्वस्तिक असेल किंवा ओम असेल, अशा प्रकारची शुभमंगल दायक चिन्हे आपल्या दरवाजावरती आपण अंकित केलेली असावी. कुंकवाने असेल किंवा हळदीने असेल मात्र अशा प्रकारची शुभचिन्हे हि आपल्या दरवाजावर आपण अवश्य काढावीत मित्रांनो दरवाजा जितका स्वच्छ सुंदर असेल अगदी तितक्या प्रमाणात धन आपल्याकडे आकर्षित होत. करून पहा, खूप कमी कालावधीत तुम्हाला दिसेल की पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात तुमच्या घरात वाढलेली आहे घरातील लोक आनंदाने वागू लागले आहेत घरातलं वातावरणच एकंदर आनंददायी बनलेलं आहे. अनेक जण आम्हाला वारंवार कॉमेंट करून विचारतात की सर घरामध्ये खूप आजार पण आहे लोक सातत्याने आजारी पडतात याचं कारण काय असावं मित्रांनो तुमच्या घरातील पाण्याची टाकी म्हणजेच वॉटर टॅंक किंवा तुमचा पाण्याचा हौद. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. अशा साठविलेल्या पाण्याचा कोणताही स्त्रोत मग पाण्याचा हौद म्हणा किंवा पाण्याची टाकी म्हणा, ही जर आग्नेय किंवा ईशान्य या देशांना असेल आग्नेय दिशा कोणती पूर्व आणि दक्षिण यांच्यामधली दिशा म्हणजे आग्नेय दिशा. आणि ईशान्य दिशा कोणती तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा तर मित्रांनो या ईशान्य किंवा आग्नेय या कोपऱ्यात जर तुमची पाण्याची टाकी असेल तर ती तात्काळ हटवा.
कारण जर या दिशांना पाण्याची टाकी असेल, पाण्याचा हौद असेल तर आपल्या घरातील लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर राहत. मनावरती अकारण ताण तणाव राहतो मन एखाद्या जड ओझ्याखाली असल्यासारखं लोक वागतात. आणि तब्येतीवर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होतो अनेकदा असं दिसून येतं की खूप मोठ्या प्रमाणात डोकेदुखी आहे सातत्याने डोकं दुखतं किंवा छातीमध्ये वेदना होतात किंवा वारंवार हार्ट अटॅक ज्याला आपण म्हणतो, किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत. बीपीचा त्रास आहे किंवा पोटाचे आजार असतात सातत्याने पोटामध्ये गॅसेस होतात. तर मित्रांनो या सर्व ज्या काही गोष्टी आहेत. आणि अनेकदा तर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडतं, मानसिक संतुलन बिघडतं. तर सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की ही पाण्याची टाकी कोणत्याही परिस्थितीत आपण आग्नेय कोपरा किंवा ईशान्य कोपरा या ठिकाणी निर्माण करू नका जर आपल्याला आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असतील तर आपल्या वास्तूमध्ये हा छोटासा बदल आपण आवश्य करा. तर मित्रांनो आपले जीवन सुखी समृद्ध राहावं यासाठी आम्ही अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण वास्तु टिप्स देत असतो.
|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||