Home Jotish घराच्या छतावर गुपचूप फेका १ लवंग - सर्व समस्यांचे समाधान होईल.

घराच्या छतावर गुपचूप फेका १ लवंग – सर्व समस्यांचे समाधान होईल.

मित्रांनो मंगळवारच्या रात्री हा एक छोटासा उपाय अवश्य करा. मंगळवारचा दिवस तांत्रिक उपाय करण्यासाठी, टोटके करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानला जातो. मित्रांनो आपल्या जीवनात जर खूप गरिबी असेल, दरिद्रता असेल, घरामध्ये पैसा येत नसेल तर मित्रांनो अशा वेळी. किंवा आपल्या घरात जर लोक सातत्याने आजारी पडत असतील, वैद्यकीय मदत घेऊन सुद्धा घरातील आजारपण हटत नसेल, कोणी काही तरी केलेल आहे, बाधा आहे. तर मित्रांनो अशा वेळी आपलं जीवन सुखी समृद्ध बनण्यासाठी, आपण मंगळवारच्या रात्री, अगदी कोणत्याही मंगळवारच्या रात्री हा एक छोटासा उपाय आवश्य करा. यासाठी आपल्याला केवळ आणि केवळ एक लवंग लागणार आहे. हि लवंग साबुत हवी, म्हणजेच अखंड हवी, तुटलेली फुटलेली नसावी आणि या लवंगाला फुल सुद्धा असाव. तर मित्रांनो अशी लवंग आपण अवश्य घ्या. लक्षात घ्या तांत्रिक प्रयोगांमध्ये तंत्र शास्त्रामध्ये या लवंगाचं फार मोठे माहात्म्य आहे. लवंग असेल, विलायची असेल, हे दोन्ही पदार्थ तंत्रशास्त्रात खूप मोठे महत्त्व बाळगतात. तर मित्रांनो आपण मंगळवारच्या रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर हा छोटासा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय आपण आपल्या घरातच करणार आहोत.

तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल, तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मित्रांनो यासाठी आपण एका पाटावरती मारुती रायांची म्हणजे हनुमानांची तस्वीर स्थापित करावी. हनुमंत राया चा फोटो असेल, तस्वीर असेल ,मूर्ती असेल ती आपण ठेवावी. हनुमाना समोर एक तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. हे तेल मोहरीचे तेल असेल की ज्याला बाजारात सरसों का तेल म्हणतात तर अति उत्तम राहील नसेल तरदुसराही तेल आपण वापरू शकता, मात्र तांत्रिक उपाय आहे आणि म्हणून आमचा सल्ला असेल की आपण बाजारातून मोहरीचे तेल अवश्य खरेदी करा. अनेक टोटके करण्यासाठी, अनेक उपाय करण्यासाठी हे मोहरीचे तेल वापरात येतं. तर मित्रांनो असा एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण मारुतीरायां पुढे प्रज्वलित करायचा आहे. लक्षात घ्या या दिव्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र सफेद नसून लाल रंगाची आपण वापरायची आहे. मित्रांनो तांत्रिक प्रयोग करताना या नियमांचं पालन काटेकोरपणे करावे लागत. अनेकजण उपाय करतात मात्र म्हणतात की फायदा झाला नाही. हे उपाय करताना झालेल्या छोट्या मोठ्या चुका सुद्धा आपल्याला त्या उपायांचा फळ प्रदान करू देत नाहीत. आता हा लाल रंगाचा धागा आपल्याला बाजारात सहज मिळून जाईल, जर नसेल तर आपण छोट्याशा वाटीमध्ये कुंकू आणि पाणी एकत्र करा आणि त्यामध्ये हा धागा भिजवत ठेवा आणि थोड्या वेळाने आपण या लाल धाग्याचा वापर करू शकता.

तर मित्रांनो असा एक मोहरीच्या तेलाचा दिवा आपण हनुमाना पुढे प्रज्वलित करायचा आहे. आणि हि जी लवंग आपण घेतलेली आहे, साबुत लवंग ती आपण हनुमानांच्या चरणी ठेवायची आहे. सोबतच आपण हनुमानांच्या पूजेमध्ये गूळ-फुटाणे वापरू शकता तसेच त्यांना लाल रंगाची फुले अत्यंत प्रिय असतात. ही लाल रंगाची फुले सुद्धा अर्पण करू शकता. आवश्यकता नाहीये मात्र जीतक आपल्याला हनुमंत रायान्ना प्रसन्न करता येईल तितक आपण अवश्य प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण करायचे आहे. ती म्हणजे मंत्राचा जप. एक मंत्र मी सांगत आहे, या मंत्राचा जप आपल्यासमोर, मारुतीरायाच्या चरणी ज्या ठिकाणी हि लवंग आपण ठेवलेली आहे. तिला आपण स्पर्श न करता या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र आहे || ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा || एक-एक शब्द अगदी काळजीपूर्वक ऐका. मंत्र जाप करताना तो स्पष्ट असायला हवा ||ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा|| मित्रांनो 108 वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे. अनेकांना वाटेल बद्दल खूप अवघड आहे अतिशय साधा सोपा आहे मी पुन्हा एकदा म्हणून दाखवतो ||ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा||

स्वाहा ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा, ओम नमो हनुमते भय भंजनाय सुखम कुरु कुरु फट् स्वाहा ,मित्रांनो हनुमान अशी देवता आहे की जी आज सुद्धा या भूलोकी, या भू-लोकांवरती, या पृथ्वीवरती अस्तित्वात आहे. आणि अगदी कमी प्रयत्नात प्रसन्न होणारी देवता म्हणजे हनुमान आहेत आणि म्हणून या मंत्राचा पण 108 वेळा जप करा मित्रांनो या लवंगे पुढे केलेला हा मंत्रांचा जप, या लवंगे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करतो. एक विलक्षण अशा प्रकारची शक्ती या लवंगे मध्ये निर्माण होते. मित्रानो या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानंतर, आपण हनुमान चालीसाचा जितक्या वेळा जप करणे शक्य होईल तितक्या वेळा करा. आमचा म्हणन असेल अकरा वेळा अवश्य करा, शक्य नसेल तर आपण एक वेळाही करू शकता. आणि त्यानंतर तिसरा मंत्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम या मंत्राचा सुद्धा अकरा वेळा, एकवीस वेळा 51 वेळा 108 वेळा जितक्या वेळा जप करणे शक्य होईल तितक्या वेळा मनःपूर्वक करा, कंटाळा करू नका. आणि मित्रांनो त्यानंतर ही लवंग आपण हातात घ्यावयाची आहे. आणि आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या आपण मारुती रायान्ना हनुमान ना बोलून दाखवायच्या आहेत. मी सांगितलं की समस्या बोलायच्या आहेत.

अनेक लोक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पणे पाहात नाहीत आणि मग काहीजण इच्छा बोलून दाखवतात. मित्रांनो या ठिकाणी आपण समस्या बोलून दाखवायच्या आहेत. ह्या समस्या या लवंगे बरोबर आपल्या घरा बाहेर जाणार आहेत. आपल्या जीवनातून दूर जाणार आहेत. आणि म्हणून आपण आपल्या जीवनातील समस्या, उदाहरणार्थ तुमच्याकडे पैसा येत नसेल तर माझ्या जीवनातील पैशांची तंगी, माझ्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात पैशांची तंगी आहे अशा प्रकारची समस्या आपण बोलून दाखवायची आहे. तुमच्या घरात आजारपण आहे, आमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात आजार पण आहे आणि आता आम्ही या आजारपणाला कंटाळलो आहोत, जीवनातील गरिबीला, दरिद्रीला कंटाळलो आहोत. अशा प्रकारे आपण आपली समस्या या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. कोणत्याही प्रकारची इच्छा व्यक्त करायची नाही. इच्छा म्हणजे काय तर माझ्या जीवनात भरपूर पैसा येवो.

माझ्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य लाभो अशाप्रकारे इच्छा या ठिकाणी व्यक्त करायची नाही. तर मित्रांनो ही समस्या बोलून दाखवा. हि लवंग आपण उजव्या हातात घट्ट पकडायची आहे. समस्या बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घराच्या छतावर जा, जर छत नसेल तर समोर अंगणात जा आणि दक्षिण दिशेकडे लक्षात घ्या दक्षिण दिशेकडे आपण ही लवंग फेकून द्यायची आहे. जितक्या दूर फेकता येईल तितक्या दूर फेकून द्या आणि एकदा ती लवंग खाली पडल्यानंतर तिच्या कडे न पाहता, तिच्याकडे दृष्टी नं टाकता आपण पुन्हा सरळ आपल्या घरामध्ये यायचं आहे. हात-पाय-तोंड धुवायचे आहेत, आणि हा उपाय करण्यापूर्वी सुद्धा या उपायास सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी स्नान करा. ज्यांना खूप अडचणी आहेत त्यांनी स्नान करूनच कोणते उपाय करत चला.

उपाय करताना जर स्नान करून शक्य नसेल तर कमीत कमी हात पाय तोंड तरी धुवा. आपण हि लवंग टाकून परत आल्यानंतर स्वच्छ हात पाय तोंड धुवा. पुन्हा एकदा मारुतीरायां पुढे नतमस्तक व्हा आणि हात जोडून प्रार्थना करा की आपल्या जीवनातील समस्या, अडचणी, बाधा हनुमंतरायांनी दूर कराव्यात. मित्रानो उपाय संपलेला आहे. मात्र हा उपाय आपण केवळ एकदा करायचा आहे. मात्र पुढील मंगळवारी जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाहीत तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री आपण हनुमानाची पूजा अवश्य करत चला.

केवळ हनुमानाचा फोटो ठेवून एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बस इतकीशी गोष्ट आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुमान चालीसा चा पाठ असेल किंवा या मंत्राचा जप असेल जो मी यापूर्वी सांगितला, किंवा जय श्रीराम असेल, ओम हन हनुमते नमः असेल, या मंत्राचा जप सातत्याने करा. तुमच्या जीवनातील या समस्या अवश्य दूर होतील हनुमंतरायाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या अखंड कुटुंबावर बरसो याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत.

|| ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read