फक्त नऊ काळी मिरी, दरिद्रता जाऊन व्हाल माला माल

0
32
dhan prapti ke kali mirch ke totke

फक्त नऊ काळी मिरी, दरिद्रता जाऊन व्हाल माला माल

Kali Miri pasun dhan prapti sathi upay in marathi

नमस्कार मित्रानो, अनेक लोक कैक प्रकारचे कर्मकांड करतात, विभिन्न प्रकारचे कर्म केल्या नंतरही ते यशस्वी होत नाहीत. काही लोक म्हणतात कि कितीही पूजापाठ केले तरी दरिद्रता पाठच सोडत नाहीये, ईश्वराची कितीही भक्ती केली, देवाला कितीही दीपक लावले किंवा कितीही मेहनत केली तरीदेखील काहीच होत नाही.

मित्रानो नजर उतरविणे किंवा नकारात्मक उर्जेला घालविण्याचे कैक प्रकारचे प्रयोग अनेक लोकांना माहित असतात, ते करत असतात. परंतु आपल्या शरीरामधील स्थित दारिद्रतेला, आपल्या घरामध्ये प्रवेश केलेल्या दारिद्रतेला, आपल्या जीवनाला काळजीत टाकणाऱ्या दारिद्रतेला काढून टाकण्यासाठी, एक अचूक व शंभर टक्के काम करणारा प्रयोग आज आपल्याला सांगत आहोत. मित्रानो, जेंव्हा कोणत्याही प्रयोगाची क्रिया सांगितली जाते. तेंव्हा जर का आपण ती क्रिया तोटका समजून केलीत, तर तो प्रयोग निकृष्ट प्रतीचे फळच देणार. याला ईश्वराद्वारे आपल्या भाग्याला बदलण्यासाठी दिला गेलेला फार मोठा आशीर्वाद समजून सन्मान पूर्वक, प्रेमाने, भक्ती भावाने हा प्रयोग केल्याने, हीच क्रिया अनंतपटीने फळ देणारी होते. कारण क्रिया ह्या समोरच्याच्या भाव व भक्तीने फळ देणाऱ्या असतात. बरेच लोक जीवनभर विभिन्न प्रकारच्या क्रिया करून पाहतात आणि म्हणतात कि कोणतीही क्रिया फलित झाली नाही. याचे कारण असे कि, जरूर तुम्ही क्रिया कितीही अचूक केली असेल पण जी क्रिया आपण करत आहेत त्याप्रती श्रद्धा, सन्मान असला पाहिजे. करून पाहूया झाले तर ठीक नाहीतर राहूदे असा भाव असला नाही पाहिजे. अविश्वासाने कोणतीही गोष्ट केली तर ती निष्फळच होणार.

तर मित्रानो आज आम्ही जी क्रिया, जो प्रयोग सांगत आहोत, तो तुम्ही विश्वासाने, श्रद्धेने व सन्मानाने करून पहा, याचा लाभ आपल्याला मिळाल्यावाचून राहणार नाही. मित्रानो आम्ही हे उपाय समाजाच्या कल्याणासाठी, समृद्धीसाठी सांगत असतो. कारण विना पैशांच्या संसार चालत नाही. धर्म, ज्ञान, अर्थ, काम, मोक्ष इत्यादी चतुर्विध पुर्षार्थाने संसार चालतो. तेंव्हा आपल्याला हे उपाय आवडत असल्यास आमच्या कर्म बंधन चॅनेलला नक्की सुब्स्क्रिब करा व आपल्या मित्रांना, आप्तेष्टाना, स्वकीयांना शेयर करायला विसरू नका आणि आमचे नवीन विडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहचण्यासाठी सोबतच असलेले घंटीचे बटनही नक्की दाबा.

चला तर मित्रानो पाहूया आजचा उपाय, जो आपल्या शरीरामध्ये, घरामढे, परिवारामध्ये स्थित दारिद्रतेला हि घालवेल आणि नजर, टोन-तोटका, एखाद्या दुष्ट शक्तीने शरीरामध्ये प्रवेश केलेला असुदे अथवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपण सतत डिप्रेशन मध्ये राहत असाल, अस्वस्थ असाल, वाईट भावना, वाईट विचार मनामध्ये येत असतील. या सर्वांसाठी रामबाणा प्रमाणे कार्य करणारा हा प्रयोग आहे. हि वस्तू जी आपण या प्रोयोगसाठी वापरणार आहोत ती वस्तू आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये नेहमी असतेच पण याच महत्व आपल्याला समजत नाही.

मित्रानो प्रकृतीद्वारे, ईश्वराद्वारे नकारात्मक उर्जेला घालविण्यासाठीच भोजनामध्ये मिसळून खाण्यासाठी हि वस्तू प्रकृतीने दिली आहे. आणि ती आहे काळी मिरी. आपण वा आपले पूर्वज भोजनामध्ये मिसळून काळी मिरी खात होते कारण हिचा रस आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा दरिद्रता राहत नाही. तर आज आपण या काळी मिरीचा असा अचूक प्रयोग पाहणार आहोत कि ज्यामुळे आपणाला अचूक स्वरूपात मनाप्रमाणे काम मिळेल किंवा आपण जसा विचार केला आहे, त्या स्थितीपर्यंत पोहचण्याची शक्ती मिळेल. आणि आपणाला आपल्या स्थितीपर्यंत पोहचण्याची शक्ती हि काळी मिरी ईश्वराच्या वरदाना प्रमाणे देईल. याचा आपणाला नक्की लाभ होईल. जर कोणी लहान मुल असेल आणि ते लहान मूळ नेहमी सतत रडत असेल, नीट जेवत नसेल, त्याला नेहमी सर्दी, ताप यामुळे ते आजारी राहत असेल तर त्याच्यावरती देखील हा प्रयोग फार गुणकारी आहे. एका रातीमध्ये आपल्याला फरक जाणवेल. मुले नीट जेवायला लागतात, आजारपण निघून जाते.

मित्रानो हा उपाय एकवेळ करण्याने, शंभर टक्के फरक पडतो. हा उपाय लहान, मोठे, स्त्री, पुरुष, वृद्ध अगदी कोणीही करू शकत. फारच साधा सोपा उपाय आहे. तर मित्रानो करायचे काय आहे हे पाहूया. मित्रानो रविवारच्या दिवशी सकाळी अथवा अमावास्येच्या दिवशी सकाळी आपणाला नऊ काळी मिरी, काळी मिरीचे नऊ दाणे मोजून घ्यायचे आहेत. व या नऊ काळी मिरीचे दाणे सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्मातून निवृत्त होऊन आपल्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या इष्ट देवतेच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवायच्या आहेत, त्या स्थानावर ठेवायच्या आहेत. आणि संध्यकाळ पर्यंत त्या तिथेच ठेवायच्या आहेत. आणि मग सूर्यास्तानंतर संध्याकाळच्यावेळी ६ किंवा ७ वाजले असता आपल्या त्या काळी मिरीचे दाणे परत घेऊन यायचे आहे. मित्रानो परत आल्यावर आपण घराच्या बाहेर पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहायचे आहे. व यानंतर सर्वात पहिला जर मूल असेल तर त्या मुलाच्या डोक्यावरून नऊवेळा सरळ म्हणजे घड्याळाच्या दिशेने व नऊ वेळा उलट्या दिशेने न्हणजे अँटी क्लॉक वाईस हि मिरी आपल्याला फिरवायची आहे, उतरवायची आहे.

आणि जर का हा प्रयोग आपण स्वतःवर करणार असाल तर आपण हि घराच्या बाहेर उभे राहा व तुम्ही स्वतः तुमच्या डोक्यावरून नऊवेळा सरळ म्हणजे घड्याळाच्या दिशेने व नऊ वेळा उलट्या दिशेने न्हणजे अँटी क्लॉक वाईस हि मिरी आपल्याला फिरवायची आहे, उतरवायची आहे.

मित्रानो जर का आपण हा उपाय लहान मुलांसाठी करत असाल तर ह्या काली मिरी त्या मुलाच्या डोक्यावरून त्याच्या आई किंवा वडिलांनी उतारवाव्यात अथवा अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तीकडून उतरवून घ्याव्यात. करा. उतारा करणाऱ्याच्या मनामध्ये, ह्रिदयामध्ये त्या मुलाविषयी अस्सीम प्रेम असले पाहिजे, त्याच्या विषयी अगदी जवळकीची भावना पाहिजे कि ज्यामुळे हा प्रयोग तुरंत कारागार होईल. आणि जर का स्वतःसाठी करत असाल, जसे कि आपणाला व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत, किंवा अन्य काही समस्या आहेत, दारिद्रतेमुळे तुम्ही व्यथित झालेले असाल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल, तुमची मेहनत फळाला येत नाहीये, तर तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये, एका छोट्याश्या वाटीमध्ये या काळीमिरी ठेवून द्या व कुलदेवतेला प्रार्थना करा कि हे माते आपली कृपा माझ्यावरती होउदे आणि आपल्या कृपेने माझ्या जीवनातील सगळी नकारात्मकता, दरिद्रता निघून जाऊदे आणि मला माझ्या कार्यामध्ये यश मिळूदे.

याच प्रमाणे जर कुलदेवाच्या मंडूरमध्ये तुम्ही काली मिरी ठेवली असेल तर अशीच प्रार्थना कुलदेवाला करा. व संध्याकाळी परत घेऊन येऊन, तुमच्या घराबाहेर पूर्व दिशेला उभारून तुम्ही स्वतःच या काली मिरी तुमच्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन तुमच्या डोक्यावरून नऊवेळा सरळ म्हणजे घड्याळाच्या दिशेने व नऊ वेळा उलट्या दिशेने न्हणजे अँटी क्लॉक वाईस हि मिरी आपण फिरवून घ्या, उतरवून घ्या. उतरवून झाल्यानंतर ह्या काळ्या मिरी आपल्या हाताच्या तळहातावरती धारा व त्यांना प्रार्थना करा कि माझी समस्त दरिद्रता या काळ्यामिरीने निघून जाऊदे, नजर निघून जाऊदे, वाईट शक्ती निघून जाऊदे, शरीरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती निघून जाऊदेत, ग्रहांचे दोष निघून जाऊदेत अशी तीन वेळेला आपल्याला प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यावर त्यामधील एक काली मिरीचा दाना घ्या व अशी भावना करा कि आपली सर्व दरिद्रता निघून जात आहे व तीन वेळा ओम कराचा जप करत हि काली मिरी पूर्व दिशेला फेकून द्या. याच प्रमाणे दुसरी मिरी घ्या व तीन वेळा ओम बोलत आग्नेय दिशेला फेकून द्या. तिसरी मिरी दक्षिण दिशेला तीनवेळा ओम म्हणत फेकून द्या. चौथी मिरी नैऋत्य दिशेला तीन वेळा ओम बोलत – बोलत फेकून द्या. यानंतर अनुक्रमे पश्चिम दिशेला, यानंतर वायव्य दिशेला, मग उत्तर दिशेला, यानंतर ईशान्य दिशेला आणि सर्वात शेवटी वरच्या दिशेला म्हणजे आकाशाकडे काळीमिरी तीन वेळा ओम बोलत-बोलत फेकून द्या.अशा प्रमाणे नाही दिशांना आठ व आकाशाकडे एक असे नऊ मिरी फेकून द्या. हे करून झाल्यानंतर हात-पाय धुवून घ्या. जर लहान मुलासाठी करत असाल तर त्याचे देखील हात-पाय धुवून घ्या.

मित्रानो हि एक छोटीशी क्रिया आहे, परंतु कोणत्याही क्रियेला आपण जेवढा सन्मान द्याल, तेवढाच सन्मान, सत्कार बदल्यात आपल्याला मिळायला लागतो. त्यामुळे हा प्रयोग मोठ्या सन्मानाने करा, जेणे करून दरिद्रता दूर होउदे व आपले जीवन समृद्ध होउदे, आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची लहर येउदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद…

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here