वास्तुशास्त्रानुसार धनलाभासाठी आरसा कुठे लावावा

0
74
mirror vastu tips

वास्तुशास्त्रानुसार धनलाभासाठी आरसा कुठे लावावा

नमस्कार मित्रानो, आपण कधीहि बाहेर जाताना, तयार होताना, आपल्याला आरसा हा नेहमीच लागतो. त्यामध्ये तर पाहून आपण स्वतःला नीट करून, व्यवस्थित तयार होऊन नंतरच बाहेर पडतो. हा आरास ज्याप्रमाणे तयार व्हायला, चांगलं आणि आकर्षक,नीटनेटकं दिसायला मदत करतोना, तेवढाच आपल्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य आणण्याससुद्धा कारणीभूत ठरू शकतो असं वास्तुशास्त्रा मानतं.  चला तर मग आज आपण माहिती घेऊ या की आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये आरसा लावताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे.

मित्रानो वास्तुशास्त्रानुसार आरसा हा जलतत्वाच्या आमलाखाली येतो आणि जलतत्त्व म्हणजेच आर्थिक सुबत्ता. त्यामुळे आरसारूपी हे जलतत्त्व योग्य ठिकाणी नसेल तर निश्चितपणे आर्थिक हानी, नुकसान होताना दिसायला लागत. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार वास्तुमधील दोषांचे निराकरण करण्यासाठी, तसेच वास्तुमधील आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी आरशाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये असणारी दक्षिण आणि पश्चिम दिशा. या दिशेच्या भिंतीवर कधीही आरसे लावू नयेत. हे फारच कष्टकारक समजलं जातं. याचा परिणाम म्हणून आरोग्या मध्ये बिघाड होऊन पैसा डॉक्टरी इलाजा मध्ये वाया जाताना दिसतं

शिवाय कारण नसताना अचानक पणे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. आर्थिक गुंतवणुकीचे  निवडलेले पर्यायसुद्धा चूक होऊन, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण. नोकरी व्यवसाय मध्ये म्हणावी तशी आर्थिक प्रगती न होणे असे अनुभव यामध्ये येताना दिसतात. या उलट वास्तूमध्ये असणारी उत्तर, ईशान्य आणि पूर्व या दिशां प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या असल्यामुळे उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशे मध्ये आरसे लावणे हे कधीही फारच लाभदायक, विशेषकरून संपत्ती कारक, भाग्य भाग्यकारक ठरू शकतं शकत. म्हणूनच आपल्या ड्रेसिंग टेबल जी  रचना आपण केलेली असते त्यावेळेला सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते.

त्याच प्रमाणे आपल्या वास्तुमधील काही दिशा, काही वेळेला काही कारणामुळे कट झालेल्या असतात. याचा सुद्धा वाईट परिणाम वास्तुशास्त्रानुसार त्या वास्तूमध्ये दिसून येतो. आणि हा अशुभ, वाईट परिणाम टाळण्यासाठी कट झालेल्या भागामध्येसुद्धा आरशाचा सुयोग्य वापर करून चांगला लाभ आणि सौभाग्य मिळवता येते. अर्थातच हा उपाय निष्णात वास्तुसल्लागाराकडून  करून घेतल्यास उत्तम. तसेच आपल्या बेडरूम मधील आरश्याची जागा सुद्धा फार महत्त्वाची असते बर का. विशेष करून ज्या लोकांच्या वैवाहिक संबंधांमध्ये अडचणी असतील ना अशा घरांमध्ये आरशाची रचना तर अवश्य तपासून पहावी. कारण वास्तुशास्त्रानुसार आरश्याची रचना बेडरूम मध्ये अशा ठिकाणी नसावी ज्यामध्ये आपला बेड त्यामध्ये दिसू शकेल. काही कारणामुळे जर अशी रचना असेल आणि ती काढता येत नसेल.

तर अशा वेळेला आपल्या झोपेच्या वेळी निदान तो आरसा झाकून तरी ठेवावा हे सगळ्यात उत्तम.  काही वेळेला आपले मुख्य प्रवेशद्वार हे वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेत, चुकीच्या ठिकाणी आलेले असते. अशा वेळी सुद्धा आपल्या वास्तूवर होणारा वाईट परिणाम टाळण्यासाठी आरशाचा उपयोग एक रिफ्लेक्टर म्हणून चांगल्या प्रकारे करून घेता येतो. आरश्यामध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे परावर्तन, रिफ्लेक्शन आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रामध्ये नको असलेली, हानिकारक, नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या वास्तूचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा आरशाचा उपयोग केला जातो.

याच  गुणधर्माचा वाईट परिणाम सुद्धा होतो बरं का. ज्यावेळी आपल्या वास्तूमध्ये असलेल्या टॉयलेट आणि बाथरूमच्या बरोबर समोरच्या भागांमध्ये आरसा लावलेला असेल तर या टॉयलेट बाथरूम मध्ये येणारी, असलेली नकारात्मक ऊर्जा रिफ्लेक्ट होऊन संपूर्ण वास्तूमध्ये निगेटिव्ह ऊर्जा पसरवण्यासाठी हा आरसा मदत करतो. आणि त्यामुळेच असा टॉयलेट आणि बाथरूमच्या समोर असलेला आरसा हा त्या ठिकाणाहून काढून टाकणं हाच सगळ्यात मस्त आणि सर्वात उत्तम उपाय ठरू शकतो.

मित्रानो आरश्यांचा आकार सुद्धा फार महत्वाचा असतो. विशेष करून गोल आणि लंबगोल असलेले आरसे  कधीही वापरू नयेत.  आरसा नेहमी चौरस किंवा आयताकृती असावा. तो धुरकट नसावा, त्याचा पारा उतरलेला नसावा. तडा गेलेला, फुटलेला नसावा. जे दुर्भाग्यकारक मानलं जात.तसेच हा वेळोवेळी स्वच्छ करत जावा, त्यावर धूळ साठू देऊ नये. आणि मित्रानो सगळ्यात शेवटच, आरशाचा उपयोग करून आपण आपल्या संपत्ती मध्ये वाढ करण्यासाठी एक भाग्य कारक, संपत्ती कारक उपाय फारच उत्तम आहे. आणि तो म्हणजे आपल्या तिजोरीमध्ये, तिजोरीच्या स्थानामध्ये हा आरसा आत मध्ये अशा रीतीने लावावा, की ज्यामध्ये आपण तिजोरीमध्ये ठेवलेल आपलं धन, आपला पैसा-अडका हा त्या आरशामध्ये दिसून तो वाढलेला दिसावा.

मित्रानो अशा पद्धतीने आरश्याचा वापर आपण आपल्या वास्तूमध्ये, वास्तुशास्त्र मध्ये असलेल्या नियमानुसार आपल्या घरामध्ये करून सुबत्ता संपत्ती आणि सौभाग्य याच्यासह, त्याच्या मदतीने आपण आपल्या वास्तूमध्ये मिळवू शकतो. मित्रानो हि होती वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आरसा कसा वापरावा कुठे असावा कुठे नसावा याची  थोडक्यात माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. धन्यवाद.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here