आपली कुलदेवता कशी ओळखावी?

0
254
kuldevta in marathi

आपली कुलदेवता कशी ओळखावी?

मित्रानो अनेक लोकांना आपली कुलदेवता माहित नाहीये. पूर्वपरम्परे नुसार आपले पूर्वज ज्या कुलदेवतेची पूजा करत आलेले आहेत त्या कुलदेवतेचाच अनेक जणांना माग गवसत नाही. तर मित्रानो असे का झाले असेल. बहुतांशी वेळा अशी परिस्थिती रोजगाराच्या, उदयोग व्यवसायाच्या शोधासाठी किंवा विस्तारासाठी केलेल्या देश परिवर्तनामुळे, देशाटन, किंवा भ्रमंतीमुळे झाला असावा असा कयास आहे. कारण उदयोग व्यवसायासाठी, नोकरी साठी बाहेर पडलेले लोक जिथे त्यांचा उदयोग व्यवसाय स्थिरावला, जिथे त्यांना रोजगार मिळाला त्या प्रदेशामध्येच स्थिरावले. त्यामुळे त्या लोकांचा असणारा आपली गावाशी, शहराशी तसेच आपल्या लोकांशी असणारा संपर्क हळूहळू  दुरावत जाऊन संपुष्टात आला कारण त्याकाळी आजच्यासारखे संपर्कांसाठी टेलिफोन किंवा मोबाइल, इंटरनेट नव्हते. व त्यामुळे या लोंकाच्या पूर्वजांना असणारी घराण्याची माहिती मिळाली नाही. कालौघात जर का हि माणसे दैववश झाली असतील तर हि माहिती त्यांच्या जाण्याबरोबरच नष्ट झाली. व ती पुढच्या पिढीला स्थानांतरित झाली नाही.

त्यामुळे अनेकजण म्हणतात आम्हाला आमची कुलदैवत माहित नाही. किंवा माहिती आहे पण ती कुठे आहे हे आम्हाला काळात नाहीये, म्हणजे जागा माहित नाहीये. किंवा काही लोंकाना असा प्रश्न अडलेला असतो कि कुलाचार कसा करावा. म्हणजे कुलदेवतेला गेल्यानंतर तिथे काय-काय करायचं असत,कशा रीतीने पूजा केली पाहिजे. या गोष्टींबद्दल त्यांना फारसं काही माहित नाहीये. कारण जेव्हा या लोकांनी नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतर केलं तेव्हा जुन्या माणसांनी त्यांना याबद्दल काही सांगितलं नाही किंवा या लोकांनी पण त्याबद्दल काही माहिती घेतली नाही.

आणि जेंव्हा लोकांना अडचणी येतात तेव्हा वाटते कि आम्हाला आमची उलदेवता माहित असेल तर आम्ही काहीतरी उपाय करू. मित्रानो आपल्याकडे पूर्वापार अशी पद्धत आहे कि, घरामध्ये कोणतेही शुभकार्य असेल तर त्या शुभकार्यामध्ये कुलदेवतेला मान द्यायचा. ओटी भरायची किंवा जी काही प्रथा असेल त्या प्रथेप्रमाणे तिची पूजा करायची. असा आपल्याकडे रिवाज आहे.

पण ज्यांना काही माहितीच नाही ते काय करणार? तर मित्रानो घाबरून जाऊ नका, आम्ही त्यासाठी एक छानसा उपाय आपल्याला देत आहोत. तो तुम्ही करू शकता. व या उपायाने तुम्हाला चांगली फळे मिळतील. व यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवता देखील सापडेल.

मित्रानो आता एक नवी पद्धत सुरु झालीय, ती म्हणजे कुल वृत्तांत. अनेक आडनावे एकत्र असल्यामुळे, अनेक जाती-पोटजाती असल्यामुळे कुल वृत्तांत सुरु झाले आहेत. म्हणजे कुल एकत्र यायला लागली आहेत. यांची एकत्र संमेलने होऊ लागली आहेत. व या संमेलनामध्ये ते कुलदेव आणि त्या कुळाबद्दल आणखी इतर गोष्टीपण सांगतात. तुम्ही काय आहात, तुमचा परिवार कसा आहे. मित्रानो खरं तर आम्ही जात-पात पळत नाही. पण ज्यांना आपल्या समाजा बद्दल माहिती आहे, कि माझा समाज हा आहे. आणि तुम्ही त्या समाजाशी निगडित राहिला तर कदाचित तुम्हाला तुमची कुलदेवता कळू शकेल.

पण सध्याच्या काळी प्रश्न असा आहे कि आपण सर्व जण एकमेकां पासून वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आणि मग लोक म्हणतात कि आमची कुलदेवता आम्हाला माहित नाहीये, एवढच काय तर आमचं गाव पण आम्हाला माहित नाहीये. त्यासाठी एक छानसा उपाय आम्ही सांगत आहोत.

आपल्या घरामध्ये ज्यांना कुलदेवता माहित नाहीये, ज्यांना माहित आहे पण सापडत नाहीये किंवा ज्यांना माहित आहे आणि ते नेहमी जातात. या सर्वांसाठी हा उपाय खूप छान आहे.  आपल्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरातील स्त्रीला सांगावं, कि जी घरातील स्वयंपाक घर सांभाळते किंवा जी घरातील ज्येष्ठ स्त्री आहे. तर आपल्या घरातील स्त्रीला सांगावे कि शुक्रवारच्या दिवशी  ११ विड्याची पाने घ्यावीत व त्या विड्याच्या पानांवरती ११ सुपाऱ्या ठेवाव्यात. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या सुपारीच्या खाली एक-एक कॉइन ज्याला आपण बंदा रुपया  म्हणतो तो ठेवला तरी चालेल. नसतील तर फक्त सुपाऱ्या ठेवल्या तरी चालतील. या विड्यांवर हळद कुंकू वाहा, आणि हळद कुंकू वाहताना क्रम लक्ष्यात ठेवा. हे पहा लक्ष्यात घ्या पहिली सुपारी जी असेल तिला गणेशाचा मान द्या. दुसरी सुपारी जी असेल तिला आपल्या कुलदेवतेचा मान द्या. तिसरी सुपारी जी असेल तिला कुलपुरुषाचा मान द्या. चौथी सुपारी जी असेल तिला वास्तुपुरुषाचा मान द्या. पाचवी सुपारी जी असेल तिला वास्तुदेवतेचा मान द्या, अशा ह्या पाच सुपाऱ्या झाली, आणखीन सहा सुपाऱ्या आहेत. तर पुढच्या सहा सुपार्यांना तुम्ही सांगा, कि माझी जी कुलदेवता आहे, कोणतीही असूदेत. मित्रानो महाराष्ट्र मध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत, कोल्हापूर आहे, तुळजापूर  आहे, वणी आहे, अंबेजोगाई आहे. अशी अनेक देवी आहेत. बऱ्याच लोंकांचे कुलदेव या शक्तिपीठांच्या देवींपैकी आहेत. महालक्ष्मी आहे, तुळजाभवानी आहे , वणी ची देवी आहे, माहूर ची रेणुका आहे. अशा अनेक देव्या पण आहेत. काहींची काळूबाई आहे. काहींची यल्लमा आहे. तर या पुढच्या सहा ज्या सुपाऱ्या आहेत  त्या तुम्ही कुलदेवतेच्या नावाने ठेवा. आणि सांगा कि माझी जी कुलदेवता, कोणीही असूदेत, तर या सुपाऱ्यांमध्ये मी तिची पूजा करतेय, सहाही सुपाऱ्यांमध्ये. मग त्या सुपार्यांची पूजा करा. आणि सांगा कि मला माझी कुलदेवता कळून येऊदेत. मला माहिती होऊदेत. असा साधारणतः आपल्याला तीन शुक्रवार पर्यंत करायचं आहे. या उपाय मुले पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये जे त्रास आहेत आणि तुम्हाला असे वाटतंय कि मला कुलदेवताच माहित नाही व त्यामुळे मी कसलाही कुलाचार करत नाही. व त्यामुळे तुम्हाला त्रास होतंय. तर तो त्रास बंद होईल. करून पहा हा उपाय. दुसऱ्या शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करताना पूजा झाल्यावर एखाद्या सवासिनीला पूजेला बोलवा आणि प्रसाद म्हणून तिला दुध साखर द्या. तिची खणा नारळाने ओटी भरा. आणि तिला आपली कुलदेवता मानून नमस्कार करा.  तिसऱ्या शुक्रवारी जर तुम्हाला जमले तर तुमच्या घराण्यातील म्हणजे ज्यांची आडनावे सारखी आहेत अशी मंडळी एकत्र करा व त्यांचा छान पैकी कुलाचार करा म्हणजे पाहुणचार करा. हे सगळे केल्यानंतर तुमच्या असे लक्ष्यात येईल कि आपण आपल्या कुलदेवतेचा मान राखलाय.

तर मित्रानो करून पहा हा उपाय, आपल्या याचा नक्की चांगला फायदा होईल आणि आपले कुलदेवता देखील मिळतील.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here