घरात गुपचूप ठेवा इथे अद्रक आलेचा 1 तुकडा पैसा आयुष्यात कमी पडणार नाही

0
61
adrak laxmi prapti upay in marathi

घरात गुपचूप ठेवा इथे अद्रकआलेचा 1 तुकडा पैसा आयुष्यात कमी पडणार नाही

मित्रांनो आज आपण आले म्हणजेच अद्रक या आल्याचे असे काही प्रभावी टोटके पाहणार आहोत, ज्योतिष उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या घरात धन, वैभव, पैसा हा कधीच कमी पडणार नाही मित्रांनो खरं तर या  आल्याचे जे उपाय केले जातात, टोटके केले जातात. हे अनेक लोक चुकीच्या गोष्टींसाठी या टोटक्यांचा वापर करतात मात्र जर योग्य पद्धतीने आणि चांगल्या हेतूने जर आपण या आल्याचे टोटके केले,  उपाय केले तर मित्रांनो आपल्या घरात धन, वैभव, पैसा हा कधीच कमी  कधीच कमी पडत नाही. यासाठी आपल्याला, आपल्या घरात गुपचूप या ठिकाणी अद्रक चा म्हणजेच आल्याचा केवळ एक तुकडा पुरायचा आहे.गाडायचाआहे. मित्रानो धन आगमनाचा हा एक अत्यंत साधा सोपा मार्ग आहे. धन म्हणजेच पैसा. पैसा प्राप्तीचा हा अत्यंत साधा सोपा मार्ग आहे मात्र विनंती करतो की कुणीही आल्याचे टोटके की ते दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दुसऱ्याला बाधा पोहोचवण्यासाठी केले जातात त्यांचा वापर करू नका कारण चुकीच्या मार्गाने केलेले आल्याचे टोटके हे उलटल्यानंतर करणाऱ्यावर  प्रचंड गंभीर अशा प्रकारचे प्रभाव सोडून जातात. मित्रांनो आलं हे लक्ष्मी कारक मानले जात, म्हणजेच माता लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी

या आल्याचा वापर तंत्र शास्त्रामध्ये मंत्रशास्त्रा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप पूर्वीपासून करण्यात येत आहे. लक्षात घ्या आपण हा जो टोटका करणार आहोत हा धनप्राप्तीचा  म्हणजे पैसा प्राप्तिचा टोटका आहे. आणि म्हणूनच आपण अगदी स्वच्छ जागी हा उपाय करायचा आहे. त्या ठिकाणी अस्वच्छता नसावी घरामध्ये कितीही गरिबी असुद्या, दरिद्रता असू द्या. ही गरिबी, ही दरिद्रता या उपायाने दूर करता येते. मित्रानो यासाठी आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यावा लागेल. हा तुकडा स्वच्छ धुऊन घ्या आणि तो फुलाच्या आकारामध्ये आपण कापून घ्यायचा आहे ज्या प्रकारे फुल असतं अगदी फुलाच्या आकारात आपल्याला हा तुकडा कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराची जी मुख्य चौकट आहे, जो  मुख्य दरवाजा आहे ज्या  मुख्य दरवाजातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो त्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला, अनेक जणांना उजवी आणि डावी बाजू समजत नाही. मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरात उभे आहात, तेव्हा तुमचा जो उजवा हात आहे ती बाजू म्हणजे तुमच्या चौकटीची उजवी बाजू .तर अशाप्रकारे तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीचा उजव्या बाजूला थोडासा खड्डा खणून त्यामध्ये आपण हा आल्याचा तुकडा गाडायचा आहे. जर तुम्हाला हे  करणे शक्य नसेल तर एक छोटीशी कुंडी आपण घेऊ शकता आणि त्या कुंडीमध्ये

माती टाकून त्यामध्ये हा आल्याचा तुकडा आपल्याला आल्याचा तुकडा गाडता येतो. मित्रानो हा आल्याचा तुकडा मातीने आपण गाडून टाकायचा आहे, पुरायचा आहे. आणि त्या वरती थोडंसं पाणी शिंपडायच आहे. अगदी ज्या प्रकारे आपण एखाद्या वृक्षाची लागवड करतो रोपटं लावतो त्या प्रकारे आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे अशा प्रकारे आपण हि माती लोटल्यानंतर त्या वरती पाणी टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि वरून अगरबत्ती किंवा धूप आपण लावायचा आहे. मित्रांनो दररोज अगदी दररोज नित्य नेमाने या कुंडीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही हा आल्याचा तुकडा पुरलेला आहे त्या ठिकाणी आपण थोडं थोडं पाणी शिपंडित चला. ज्या प्रकारे आपण झाडांची निगा राखतो अगदी त्या प्रकारे याची आपण निगा राखा. हे रोपटं जितके चांगले उगवेल तितके तुमचे भाग्य तुमची साथ देईल भाग्य सुद्धा चमकू लागेल. मात्र काळजी करू नका जर हे रोपटे उगवले नाही तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये या छोट्याशा टोटक्याने धनप्राप्ती होऊ लागेल पैसा येऊ लागेल मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी.  आपणास माहीत असेल की आपल्या दारामध्ये, आपल्या अंगणात जी तुळस आहे या तुळशीची सुद्धा आपण नित्यनियमाने पूजा करायला हवी. काही काही वृक्ष असे आहेत,उदाहरणार्थ झेंडू. या झेंडूची लागवड आपण आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या परसबागेत अवश्य करा हा झेंडू सुद्धा लक्ष्मी कारक मानला जातो .

तुळस प्रत्यक्ष माता लक्ष्मीचच  रूप आहे. विष्णुप्रिया आहे. सोबत तुमच्या घराच्या जवळपास जर पिंपळ असेल, वड असेल  तर या झाडांची सुद्धा पूजा कारण, अगदी विशेष प्रसंगी, ज्या दिवशी सणवार आहे.  त्या दिवशी पिंपळ असेल,  उंबर असेल , वड असेल या  झाडांची पूजा करत चला. त्यांना आपण पाणी सुद्धा घालू शकता जल अर्पण करू शकता अत्यंत चांगले  प्रभाव घडून येतात. घरांमध्ये यश सुख समृद्धी  सर्वकाही नांदू लागतं. मित्रांनो हा टोटका तर आपण करत आहोत सोबतच छोटासा आल्याचा तुकडा अगदी छोटासा आल्याचा तुकडा आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता. तुमची पर्स, तुमचं पॉकेट कधीच रिकाम राहणार नाही. आणि कालांतराने तुम्ही हा उपाय, हा टोटका रिपीट सुद्धा  करू शकता. तुम्हाला वाटतं की आता हा आल्याचा तुकडा खराब झालेला आहे जीर्ण झालेला आहे तर तुम्ही त्या जागी नवीन तुकड्याने नवीन उपाय करू शकता. अगदी कोणत्याही दिवशी, कोणत्याही तिथीला आणि  तुम्ही तुमचा जो कॅश बॉक्स आहे तुम्ही ज्या ठिकाणी धन, पैसे ठेवता, तुमची कपाट असेल किंवा तुमची तिजोरी असेल त्यामध्ये सुद्धा आपण अशाप्रकारे हे आलं, अद्रकचा  तुकडा किंवा पावडर मिळते सुंठ पावडर ती जरी ठेवलीत तरी सुद्धा चालेल. मित्रांना छोटे-छोटे उपाय आहेत खरंतर अद्रक चा वापर करून आल्याचा वापर करून अनेक भयंकर टोटके केले जातात मात्र आपण अशा टोटक्यांच्या आहारी जाऊ नका अशा वाममार्गाने केलेले कोणतेही टोटके हे शेवटी आपणास त्रासदायक ठरत असतात. अत्यंत साधा सोपा उपाय मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे नक्की करून पहा.

|| शुभम भवतु ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here