करा हा एक उपाय होईल अचानक धन प्राप्ति

0
128
achanak dhan prapti

करा हा एक उपाय होईल अचानक धन प्राप्ति

मित्रांनो आजचा आपला उपाय अचानक धन प्राप्ति साठी असणार आहे ज्याला आपण घबाड सापडले असेही म्हणतो मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये बरेचसे उपाय असे असतात की जे केल्याने आपल्याला अचानक धन प्राप्ति होते. मित्रांनो अचानक धन प्राप्ति चा अर्थ असा होतो की तुमच्याकडे अचानक अशी नामी संधी चालून येते किंवा तुम्हाला धन प्राप्त होतं. धन सापडतं किंवा तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय करताय त्याच्यामध्ये प्रचंड प्रगती होते, अचानक प्रचंड प्रगती होते. मित्रांनो तुम्ही जर तुम्ही नोकरी करताय, तर त्याच्यामध्ये अचानक प्रमोशनचे येतील. अगदी अनपेक्षितपणे, तुम्ही कोणताहि व्यापार करताय व्यापार प्रचंड गतीने वाढू लागेल. किंवा तुम्ही कोणताही उद्योग व्यवसाय करत नाहीयेत, मात्र मेहनत करताय, अभ्यास करताय, तर त्या परीक्षेमध्ये अचानक यशप्राप्ती होते. थोडक्यात काय तर या ना त्या कारणाने तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करू लागाल. प्रचंड धन तुमच्याकडे येऊ लागेल. पैसा येण्याचे मार्ग खुले होतील. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खूप मेहनत करत आलेला असाल तुम्ही खूप कष्ट केलेले आहेत अनेक ट्रिक्स वापरलेले आहेत, अनेक उपाय केले आहे जेणेकरून पैसा येऊ शकेल. मात्र हे सर्व च्या सर्व उपाय जर फेल झालेले असतील हे उपाय कुचकामी ठरले असतील

तर कदाचित तुमच्या अवतीभवती जी नकारात्मक ऊर्जा आहे ही त्यासाठी कारणीभूत असेल. जेव्हा आपल्या सभोवती आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, मित्रांनो त्याचा परिणाम हा आपल्या वर्तनावर होतो, आपल्या वागण्यावर होतो. आणि ज्योतिष शास्त्र असं मानत, की ज्या व्यक्तीच्या भोवती नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते त्या व्यक्तीच्या हातून जी काम घडतात त्यांना यश मिळत नाही तुम्ही जो व्यापार व्यवसाय करताय त्याची प्रगती होत नाही. त्यातून पैसा प्राप्त होत नाही. पैसा येता येता थांबतो.

तर मित्रांनो या सर्व कारणांसाठी, ही नकारात्मक ऊर्जा घालवणारा असा हा उपाय असणार आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला काळे तीळ लागणार आहेत. तर तुम्ही म्हणाल की काळे ते कुठेही मिळत नाहीत आमच्या गावात आमच्या परिसरात मिळत नाहीत शहरात मिळत नाहीत मित्रांनो ज्या ठिकाणी देव पूजेचे साहित्य मिळतं, पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला हे काळे तीळ नक्की मिळतील. जर तुमच्या गावात तुमच्या परिसरात जे दुकान आहे तिथे हे काळे तीळ नसतील तर मित्रांनो एखाद्या मोठ्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा हे काळे तीळ सहज मिळतात. तिथे हि जर हे काळे तीळ नसतील तर मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे खरेदी करू शकता.

किंवा ज्या ठिकाणी मोठी देवस्थान आहेत, तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी तर अवश्य हे काळे तीळ विकण्यास ठेवलेले असतात. ऑनलाईन मध्ये तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील अशा विविध प्रकारच्या ऑनलाईन वेबसाईट्सवर हे काळे तीळ खरेदी करू शकता. हे जास्त महागही नसतात ते मित्रांनो असे काळे आपणास लागणार आहेत तर हे काळे तीळ आपण शनिवारचा दिवस निवडणार आहोत शनिवारच्या दिवशी दिवसभरात किंवा रात्री कधीही आपण हे काळे तीळ एका कागदामध्ये घ्यायचे आहेत.

छोट्याशा कागदामध्ये हे काळे तीळ घेऊन आपण एखाद्या चौराहा, ज्याला आपण चौक म्हणतो. ज्या ठिकाणी चार रस्ते फुटतात अशा ठिकाणी जायचं आहे, त्या चौकाजवळ गेल्यानंतर त्या चौकात गेल्यानंतर मित्रांनो आपल्या चारही दिशांना म्हणजेच आपल्या समोरची दिशा असेल कोणतीही असू द्या या समोरच्या दिशेला चिमूटभर काळे तिल फेकायचे आहेत उजव्या हाताने. लक्षात घ्या डाव्या हातात आपण ती पूड धरायची आहे. आणि उजव्या हाताने हे काळे तिल फेकायचे आहेत. त्यानंतर समोर फेकल्यानंतर पाठीमागे, समोर फेकल्यानंतर पाठीमागे आपण चिमूटभर काळे तीळ फेकायचे आहेत. त्यानंतर उजव्या बाजूला हे चिमुटभर काळे तीळ फेकायचे आहेत. आणि त्यानंतर डाव्या बाजूला अशा प्रकारे चारही बाजूंना आपण हे काळे तीळ फेकणार आहोत. हे फेकताना आपलं तोंड एकाच दिशेला आपण ठेवायच आहे. आपण तोंड बदलायचं नाही आहे.

यानंतर पाचवी जी दिशा आहे ती आपली वरची दिशा आहे, आपल्या डोक्यावर. तर आपल्या डोक्यावरती म्हणजे वरच्या आकाशाच्या दिशेने आपण चिमूटभर काळे तीळ फेकायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या हा उपाय आपण केवळ आणि केवळ शनिवारच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपण थेट आपल्या घरामध्ये यायचा आहे पाठीमागे वळून पाहायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीत मागे न वळता कोणाशीही न बोलता आपण जायचं सुद्धा आहे आणि परत येताना सुद्धा कुणाशीही आपण बोलायचं नाहीये.

तर न बोलता पण घरी यायचा आहे हात पाय धुवायचे आहेत तोंड धुवायच आहे आणि आपल्या देवघरा समोर बसून ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो एक वेळा, तीन वेळा, 7 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा किंवा 108 ची कितीही आवर्तने कितीही वेळा 108 वेळा आपण हा मंत्र जप करायचा आहे मित्रांनो अद्भुत अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला दिसून येतील तुम्ही हवतर कोणत्याही किंवा कितीही शनिवारी हा उपाय रिपीट करू शकता पुनरावृत्त करू शकता तुम्हाला दिसेल की नवनवीन संधी पैसे येण्याच्या, धन प्राप्तीच्या, धन खुले होण्याच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत आणि तुमच्याकडे धन आकर्षित होत आहे मित्रांनो ज्यांचा या गोष्टीवर विश्वास

त्यांनी कृपया अशा प्रकारचे उपाय करू नका कारण विश्वास श्रद्धा आस्था या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्योतिष शास्त्रामध्ये कोणता ही ज्योतिषी उपाय करताना धनप्राप्तीचे लक्ष्मी प्राप्तीचे या गोष्टींचे पालन आपल्याला करावा लागतो तर मित्रांनो देवपूजा दररोज करत चला. देवावर विश्वास ठेवा आणि कर्म आणि मेहनत करा कष्ट करा त्याशिवाय हे जे टोटके आहेत हे जे काही उपाय आहेत ते काम करत नाहीत याबरोबरच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here